पावडेवाडीत ग्रामसेवकास मारहाण
By Admin | Updated: May 7, 2014 00:47 IST2014-05-07T00:47:25+5:302014-05-07T00:47:37+5:30
नांदेड : पावडेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात घुसून ग्रामसेवकास माराहाण केल्याप्रकरणी भाग्यनगर ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे़

पावडेवाडीत ग्रामसेवकास मारहाण
नांदेड : पावडेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात घुसून ग्रामसेवकास माराहाण केल्याप्रकरणी भाग्यनगर ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे़ शहरालगत असलेल्या वाडी़ बु़ येथे कार्यरत ग्रामसेवक आनंदा मारोतराव सावंत हे ग्रामपंचायत कार्यालयात दैनंदिन कामकाज करत होते़ दरम्यान, मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास यातील आरोपी गणपत तात्याराव पावडे (वय ४८) याने ग्रा़ पं़ कार्यालयात प्रवेश करुन सावंत यांच्याशी हुज्जत घातली़ तसेच शिवीगाळ करत सावंत यांना मारहाण केली़ याप्रकरणी ग्रामसेवक सावंत यांनी भाग्यनगर ठाण्यात गणपत पावडे याच्याविरोधात तक्रार दिली़ शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पावडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे़ तपास पोहेकॉ़ केंद्रे हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)