शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल योजनेसाठी पाच हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवक रंगेहाथ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 14:48 IST

ग्रामसेवक राजेंद्र रावते यांची मूळ नियुक्ती गंगापूरपासून जवळ असलेल्या शिरसगाव येथे आहे.

ठळक मुद्दे माळीवाडगाव ग्रामपंचायतीचा पदभार गेल्या वर्षभरापासून रावते बघत होते.

लासूर स्टेशन: रमाई आवास योजनेअंतर्गत तक्रारदाराचे नाव पडताळणीसाठी पाठवण्याचे बक्षीस म्हणून पाच हजार रुपये घेणाऱ्या माळीवाडगाव येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही घटना सोमवारी ( दि. १० ) सकाळी 11 वाजता लासुर स्टेशन येथील बसस्थानकाच्या आवारात घडली. राजेंद्र जयराम रावते ( 35, रा शिल्लेगाव) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळीवडगाव येथील तक्रारदार घरकुल मिळण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यानुषंगाने रमाई आवास योजनेअंतर्गत तक्रारदाराचे नाव पडताळणीसाठी पाठवण्याचे बक्षीस म्हणून पाच हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी ग्रामसेवक राजेंद्र जयराम रावते यांनी केली. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

त्यावरून आज सकाळी लासुर स्टेशन बस स्थानकाच्या आवारात सकाळी 11 वाजता सापळा लावण्यात आला होता. यावेळी तक्रारदाराकडून रोख पाच हजार रुपये स्वीकारताना राजेंद्र रावते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेश्मा सौदागर, पो.ना. रविंद्र अंबेकर, पो. ना. गोपाल बरंडवाल पो.कॉ. किशोर म्हस्के चालक पो. कॉ. शिंदे  यांनी केली.

ग्रामसेवक राजेंद्र रावते यांची मूळ नियुक्ती गंगापूरपासून जवळ असलेल्या शिरसगाव येथे आहे. या गावापासून तब्बल तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माळीवाडगाव ग्रामपंचायतीचा पदभार गेल्या वर्षभरापासून रावते बघत होते. सोयीची ग्रामपंचायत म्हणून त्यांनी या ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारल्याची चर्चा होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबाद