तंटामुक्त अभियानाकडे ग्रा.पं.नी फिरविली पाठ
By Admin | Updated: November 23, 2014 00:25 IST2014-11-22T23:36:15+5:302014-11-23T00:25:14+5:30
शिरूरकासार : गावातील भांडणे गावातच सामंजस्याने मिटविले जावीत आणि गावात शांतता, सलोखा नांदावा अशा उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले.

तंटामुक्त अभियानाकडे ग्रा.पं.नी फिरविली पाठ
शिरूरकासार : गावातील भांडणे गावातच सामंजस्याने मिटविले जावीत आणि गावात शांतता, सलोखा नांदावा अशा उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले. प्रारंभी या अभियानाला चांगला प्रतिसादही भेटला. असे असले तरीही शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सहा ग्रामपंचायतींनी या चांगल्या योजनेकडे पाठ फिरविली आहे.
मोहिमेचा गावाला दुहेरी फायदा होत असून ग्रामपंचायतींना म्हणजेच गावाला तंटामुक्त गाव म्हणून शासनाकडून बक्षीस दिले जाते. या निधीचा उपयोग गावात सार्वजनिक कामासाठी केला जातो. शिरूर पोलीस स्टेशन मर्यादित असलेल्या २७ गावांनी ७५ लाख रुपये बक्षीस मिळविलेले आहे. हे बक्षीस पहिल्या टप्प्यात म्हणजेच २००९-१० मध्ये ११ ग्रामपंचायतींना ३५ लाख तर २०१०-११ मध्ये १६ ग्रामपंचायतींना ४० लाखांचे बक्षीस मिळाले आहे. मात्र उर्वरित सहा ग्रामपंचायतींना तंटामुक्त अभियानाचे महत्त्व पटले नसल्यागत दिसून येत आहे. या सहा ग्रामपंचायतींनी अद्यापपर्यंत अभियानात सहभागच नोंदविलेला नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शासनाकडून प्रत्येक अभियान हे जनहित डोळ्यासमोर ठेवून राबविले जाते. मात्र याची अंमलबजावणीत सहभाग हा महत्त्वाचा असतो. तंटामुक्ती अभियानाचा मात्र सध्या विसर पडल्यागत चित्र दिसून येत आहे. सहा वर्षे झाले तरी सहा गावांनी तंटामुक्तीसाठी प्रवेशिका दाखल करण्याचे औदार्य दाखविले नाही. (वार्ताहर)