ग्रामीण बँकेची नकारघंटा

By Admin | Updated: July 10, 2014 00:44 IST2014-07-10T00:20:54+5:302014-07-10T00:44:54+5:30

बारूळ : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठणास ग्रामीण बँकेची बारूळ शाखा टाळाटाळ करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे़

Grameen Bank Denial | ग्रामीण बँकेची नकारघंटा

ग्रामीण बँकेची नकारघंटा

बारूळ : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठणास ग्रामीण बँकेची बारूळ शाखा टाळाटाळ करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे़
शिरूर, बारूळ, वरवंट, रहाटी, मंगनाळी आदी गावांतील शेतकऱ्यांचे गारपीटीने मोेठे नुकसान झाले होते़ शासनाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश देवूनही ग्रामीण बँक मात्र आम्हाला लेखी आदेश आले नाहीत, त्यामुळे आम्ही कर्जाचे पुनर्गठण करणार नाही असे सांगितले़ याशिवाय या शाखेला नवीन पीक कर्ज देण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने नवीन पीक कर्ज देऊ शकणार नाहीत, असेही बँकेने शेतकऱ्यांना कळविले़ एकूणच या प्रकाराच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू असे अंकुश पाटील जाधव, नारायण पंदिलवाड, गणेश तोटवाड, जगदीश वडजे, माधव देवकत्ते, चांदू नवघरे आदींनी सांगितले़
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पुनर्गठण करण्याबाबत तहसीलदार किंवा आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लेखी आदेश नाहीत़ या बँकेने नवीन पीककर्जही देण्यास वरिष्ठ अधिकारी नकार देत आहेत - बी़बी़ शिंदे, शाखाधिकारी़
शेतकऱ्यांच्या पिकाचे पुनर्गठण करण्याचे आदेश आम्हाला प्राप्त झाले नाहीत - व्ही़एस़ शिंदे, तहसीलदार, कंधाऱ
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गारपीटग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण व्हावे असे सांगितले़ बँका मात्र आमच्याकडून पीक वसुली करतात व नवीन पीक कर्ज देत नाहीत - अंकुश जाधव, शेतकरी, बारुळ

Web Title: Grameen Bank Denial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.