ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरास १५०० महिलांचा रुद्राभिषेक
By Admin | Updated: March 19, 2016 00:56 IST2016-03-19T00:35:15+5:302016-03-19T00:56:10+5:30
लातूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून शुक्रवारी १५०० महिलांनी ग्रामदैवतास रुद्राभिषेक करुन, ११ हजार मीटरची वस्त्रमाळ अर्पण केली.

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरास १५०० महिलांचा रुद्राभिषेक
लातूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून शुक्रवारी १५०० महिलांनी ग्रामदैवतास रुद्राभिषेक करुन, ११ हजार मीटरची वस्त्रमाळ अर्पण केली.
महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षी महिला भक्तांकडून ग्रामदैवतास रुद्राभिषेक करण्यात येतो. मागच्या ११ वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. यावर्षी १५०० महिला भाविकांनी ग्रामदैवतास रुद्राभिषेक केला. या रुद्राभिषेकास प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलिस अधीक्षक लता फड यांची उपस्थिती होती. यावेळी शहर व परिसरातील ४५ रुद्र महिला मंडळांच्या पदाधिकारी, सदस्यांनीही हजेरी लावली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्षांचा देवस्थान समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. या संगीत रुद्राभिषेक सोहळ््याला देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, अध्यक्ष ज्ञानोबा गोपे, सचिव अशोक भोसले, रमेश बिसेन, अॅड़ शुभदा रेड्डी, स्मिता गोजमगुंडे, पाटणकर, शिवगंगा कंगळे यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)