शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची चुरस वाढली; मातब्बरांकडून वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी शर्थीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 13:56 IST

Gram Panchayat elections : वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या रांजणगाव, जोगेश्वरी, आंबेलोहळ, वाळूज, नारायणपूर, वळदगाव, पंढरपूर, तिसगाव, पाटोदा आदी ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे

ठळक मुद्देया अर्थसंपन्न ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष व गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. या परिसरातील ग्रामपंचायतींना औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर मिळत असतो.

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या ठरणार आहेत. या निवडणुकीत वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी धनदांडग्या मातब्बर उमेदवारांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू करून त्यांना विविध प्रकारचे प्रलोभने दाखविली जात असल्याचे चित्र उद्योगनगरीत पहावयास मिळत आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या रांजणगाव, जोगेश्वरी, आंबेलोहळ, वाळूज, नारायणपूर, वळदगाव, पंढरपूर, तिसगाव, पाटोदा आदी ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. या अर्थसंपन्न ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष व गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. या परिसरातील ग्रामपंचायतींना औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर मिळत असतो. याच बरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती व शासनाकडून विकासकामासाठी ग्रामपंचायतींना मोठा निधी मिळत असल्याने या ग्रामपंचायती अर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळखल्या जातात.

उद्योगनगरीतील ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून डावपेच आखण्याचे काम वेगात सुरू आहे. या निवडणुकीत सरपंच व सदस्यपदी वर्णी लागावी, यासाठी गावपातळीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करीत नामांकन अर्जही दाखल केले आहे. वाळूज, रांजणगाव, जोगेश्वरी, पंढरपूर या ठिकाणी मातब्बर व धनदांडग्या उमेदवारांनी स्वत:बरोबर कुटुंबातील सदस्यांचे अर्ज भरल्याने या मातब्बरांचे समर्थक व सर्वसामान्य नागरिकांत मात्र नाराजीचा सूर उमटत आहे. या मातब्बर उमेदवारांकडून घराणेशाहीला प्राधान्य दिले जात असल्याने त्यांचे समर्थक नाराज असल्याचे चित्र या परिसरात पहावयास मिळत आहे.

वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी प्रयत्न३० डिसेंबरला नामांकन अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर बहुतांश उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहे. आपल्याला वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी, यासाठी मातब्बर धनदांडग्या उमेदवारांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे. धनदांडग्या उमेदवारांकडून वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांची मनधरणी सुरू केली असून, त्यांना विविध प्रकारची प्रलोभनही दिली जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ४ जानेवारीला नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, वरचढ ठरणाऱ्या उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी मातब्बर उमेदवारांचा खिसा चांगलाच रिकामा होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक