‘ईपॉस’द्वारेच मिळणार धान्य
By Admin | Updated: April 8, 2017 23:44 IST2017-04-08T23:42:28+5:302017-04-08T23:44:27+5:30
जालना : जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानांतून आता ई पॉस मशीनद्वारेच होणार असून, आठ तालुक्यांत येत्या चार दिवसांत या मशीनचे वाटप करण्यात येणार आहेत.

‘ईपॉस’द्वारेच मिळणार धान्य
जालना : जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानांतून आता ई पॉस मशीनद्वारेच होणार असून, आठ तालुक्यांत येत्या चार दिवसांत या मशीनचे वाटप करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यासाठी १२८६ ई पॉस मशीन प्राप्त झाल्या असून, एप्रिल महिन्याचे धान्य या मशीनद्वारे वाटप होणार आहे. कॅशलेस व्यवहार व बायोमेट्रिकद्वारे धान्य वाटपासाठी ईपॉस मशीन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यासाठीचे प्रशिक्षण स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणार असून, यावेळी दुकानदारांना काही शंका अथवा प्रश्न असल्याचे त्याचे निराकरण करण्यात येईल, असे पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांनी सांगितले. या मशीनमुळे धान्य वितरणात पारदर्शकता येऊन प्रक्रिया सुलभ होईल, असा विश्वास नंदकर यांनी व्यक्त केला.
यासाठीचे प्रशिक्षण जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात येणार आहे. मशीन वाटप कार्यक्रमाचे नियोजन पुरवठा विभागाने केले
आहे. यात दहा एप्रिल रोजी जाफराबाद येथे सकाळी नऊ वाजता, बदनापूर येथे दुपारी दोन वाजता तर ११ एप्रिल रोजी अंबड येथे नऊ वाजता, घनसावंगी येथे दोन वाजता, १२ एप्रिल रोजी भोकरदन येथे नऊ वाजता तर मंठा येथे दुपारी दोन वाजता, १३ एप्रिल रोजी परतूर येथे सकाळी नऊ वाजता तर जालना येथे दुपारी दोन वाजता या मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)