जि.प.तील हजारावर शिक्षकांना दर्जावाढ

By Admin | Updated: June 22, 2014 00:05 IST2014-06-21T23:25:34+5:302014-06-22T00:05:48+5:30

बीड: पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या दर्जावाढीची प्रक्रिया गुंडाळावी लागली होती़ आचारसंहिता संपल्यानंतर शनिवारपासून दर्जावाढ देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे़

Graduation of Thousand Teachers in ZP | जि.प.तील हजारावर शिक्षकांना दर्जावाढ

जि.प.तील हजारावर शिक्षकांना दर्जावाढ

बीड: पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या दर्जावाढीची प्रक्रिया गुंडाळावी लागली होती़ आचारसंहिता संपल्यानंतर शनिवारपासून दर्जावाढ देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे़ हजारापेक्षा अधिक शिक्षकपात्र असून पहिल्या दिवशी २९७ जणांना दर्जावाढ बहाल करण्यात आली़
जिल्हा परिषदेच्या स्व़ वसंतराव नाईक सभागृहात सकाळी साडेदहा वाजेपासून दर्जावाढीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली़ यावेळी सभापती संदीप क्षीरसागर, शिक्षणाधिकारी (प्रा़) भास्कर देवगुडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आऱ आऱ भारती यांची उपस्थिती होती़ ही प्रक्रिया समुपदेशनानुसार पार पडली़
एकूण १०६६ शिक्षकांना दर्जावाढ दिली जाणार आहे़ दर्जावाढीसाठी बी.ए., बी.एड. ही शैक्षणिक अर्हता असलेल्या शिक्षकांना प्राधान्य दिले जाणार आहे़ पहिल्या दिवशी ३०० शिक्षकांना पाचारण केले होते़ त्यापैकी २९७ जणांना प्राथमिक पदवीधर म्हणून दर्जावाढ देण्यात आला़ तीन शिक्षकांनी दर्जावाढीस नकार दिला़ उर्वरित ७६६ शिक्षकांना सोमवार, मंगळवारी दर्जावाढ दिला जाणार आहे़ दर्जावाढ मिळालेल्या शिक्षकांना वाढीव वेतनश्रेणीही मिळणार आहे़ सकाळपासूनच शेकडो शिक्षक जिल्हा परिषदेच्या आवारात गोळा झाले होते़ एकावेळी पाच शिक्षकांना सभागृहात प्रवेश दिला़ प्रक्रिया सुरळीत पार पडली़ (प्रतिनिधी)

Web Title: Graduation of Thousand Teachers in ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.