शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

पदवीधरच्या प्रचारतोफा चिखलफेकीने थंडावल्या; उद्या होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 2:08 PM

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टीसह अपक्ष उमेदवार निवडणूक मैदानात आहेत.

ठळक मुद्देमंगळवारी होणार मतदान३५ उमेदवार मैदानात

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचार तोफा रविवारी सायंकाळी ५ वाजता थंडावल्या. रणधुमाळीचा शेवटचा दिवस बहुतांश उमेदवारांनी एकमेकांवर राजकीय चिखलफेक करीत गाजविला. 

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टीसह अपक्ष उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. शेवटच्या दिवशी जोरदार आरोप-प्रत्यारोप करीत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी ‘मीच’ निवडून येणार असल्याचा दावा केला. ३५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असून, रविवारी सायंकाळी ५ वाजेनंतर प्रशासनाच्या ताब्यात सगळी यंत्रणा गेली असून, आचारसंहिता कक्षाची सर्व उमेदवारांवर करडी नजर राहणार आहे. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. 

३ लाख ७३ हजार १६६ पदवीधर मतदार मराठवाडा पदवीधर मतदारसंघात ३ लाख ७३ हजार १६६ पदवीधर मतदार असून, त्यात पुरुष पदवीधर मतदार २ लाख ८६ हजार २४९, तर महिला पदवीधर ८६ हजार ९०९ आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत सुमारे २५ टक्के महिला मतदारांचे प्रमाण आहे. विभागात एकूण ९३७ सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आली आहे. सर्वाधिक १ लाख ६३ हजार ७९ पदवीधर मतदार संख्या औरंगाबाद जिल्ह्याची आहे. जालना २९ हजार ७६५, परभणी ३२ हजार ७१५, हिंगोलीत १६ हजार ७९४, नांदेड ४९ हजार २८५, बीड ६३ हजार ४३६, लातूर ४१ हजार १९०, उस्मानाबाद ३३ हजार ६३२  इतकी आहे. औरंगाबााद विभागात एकूण ८१३ मतदान केंद्रे आहेत. औरंगाबाद २०६, जालना ७४, परभणी ७८, हिंगोली ३९, नांदेड १२३, लातूर ८८, उस्मानाबाद ७४, तर बीडमध्ये १३१ मतदान केंद्रे आहेत. 

या पुराव्यांआधारे मतदान शक्यआधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, पारपत्र,  केंद्र-राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी उद्योगांनी वितरित केलेले सेवा ओळखपत्र लोकप्रतिनिधींचे अधिकृत ओळखपत्र, शिक्षकांना दिलेले ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे  पदवी-पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र आदी मतदार पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील.

आद्याक्षरे लिहिलेले मतदान होईल बादमराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत १ डिसेंबर रोजी पदवीधर मतदासंघ निवडणुकीसाठी मतदान होत असून मतदारांना काळजीपूर्वक पत्रिकेवर मत अंकात नोंदवावे लागेल. अंगठा लावलेले, सही, आद्याक्षरे किंवा कुठलेही चिन्ह, खूण करून केलेले मतदान बाद ठरेल. गेल्यावेळी १२ हजारांपेक्षा अधिक मते बाद ठरली होती. आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रावर मतपत्रिकेसोबत पुरविलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर मतदारांना करावा लागेल. याशिवाय इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईंट पेनचा वापर करून केलेले मतदान अवैध ठरेल.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबाद