शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर आमदारकीचे 'लक्ष्य'; विरोध झुगारून निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:22 IST

मंत्री अतुल सावे, आ. संजय केणेकर यांनी जुळवून आणला योग

छत्रपती संभाजीनगर : आगामी काळातील मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या तोंडावर सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख व समर्थकांनी बुधवारी मुंबईत पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षातील अनेकांचा विरोध असतानाही ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, आ. संजय केणेकर यांनी या प्रवेशाचा योग जुळवून आणला.

यावेळी आ. अनुराधा चव्हाण आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत प्रवेशाचा विषय गेला. मंत्री आणि महामंत्री असताना पक्षप्रवेश थांबत असेल तर आमचा उपयोग काय, अशी खंत केणेकरांनी व्यक्त केल्यानंतर अखेर प्रवेश दिल्याचे भाजप सुत्रांनी सांगितले.

एम. के. देशमुख, निवृत्त उपसंचालक भाऊसाहेब तुपे, रमेश तांगडे, शिवाजी पवार, व्यंकटेश कोमटवार, मनोज पाटील, संस्थाचालक महामंडळाचे कार्याध्यक्ष आबासाहेब जगताप, शिवाजी देवरे, प्रा. रामलाल पंडुरे, प्रा. अभिलाष सोनवणे, राजीव शिंदे, विजय द्वारकोंडे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यात पदवीधर निवडणूक होणे शक्य आहे. सध्या मतदार नोंदणी सुरू आहे. युती करून हा मतदारसंघ लढण्याची कुठल्याच पक्षाची मानसिकता सध्या नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शरद पवार गट, ठाकरे सेना, शिंदेसेनेतील इच्छुक उमेदवारीची तयारी करीत आहेत. भाजपनेदेखील देशमुख यांच्या रुपाने उमेदवार हेरला असून, स्वबळावरच भाजप पदवीधरला सामोरे जाणार असल्याची चर्चा आहे.

भाजपची ताकद वाढेलदेशमुख यांच्या पक्षात येण्यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात भाजपची ताकद वाढेल. त्यांना उमेदवारी देण्याबाबत पक्ष निर्णय घेईल.-अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री

उमेदवारीचा निर्णय पक्षाकडेदेशमुख यांच्यासह ४ माजी शिक्षणाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील संघटनांचे प्रमुख भाजपमध्ये आल्याने बळ वाढले आहे. त्यांच्या उमेदवारीचा निर्णय पक्ष घेईल.- संजय केणेकर, आमदार

मतदारसंघ गिफ्ट देऊसावे यांच्या विनंतीवरून विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. सावेंचा आग्रह, केणेकरांच्या प्रयत्नांमुळे भाजपत प्रवेश केला. शिक्षक, पदवीधर मतदारसंघ विजयी होऊ, असे काम करू.-एम. के. देशमुख, भाजप

पक्षांतर्गत होता विरोध...देशमुख यांना भाजपमध्ये घेण्यास शहरातील पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. परंतु, मंत्री सावे आणि आ. केणेकर यांनी प्रतिष्ठा पणाला लावून देशमुख यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर केला. देशमुख पक्षात आल्यामुळे पदवीधर लढण्यासाठी जे इच्छूक आहेत, त्यांचे अवसान गळाले आहे. त्यामुळेच देशमुख व इतर पक्षात येऊ नयेत, यासाठी पक्षातील इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-Education Officer Deshmukh Joins BJP Amid Opposition, Eyes Graduate Constituency

Web Summary : M. K. Deshmukh joined BJP amidst internal opposition, aiming for the Marathwada graduate constituency election. Supported by ministers despite party resistance, his entry strengthens BJP's presence in the teacher and graduate segments, potentially influencing future candidate selections.
टॅग्स :Atul Saveअतुल सावेMarathwadaमराठवाडाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरElectionनिवडणूक 2024BJPभाजपा