‘ग्रेडींग’चा शेतकऱ्यांना भुर्दंड

By Admin | Updated: March 22, 2017 00:33 IST2017-03-22T00:30:14+5:302017-03-22T00:33:05+5:30

वाशी : भाडे, हमाली आदी खर्चापोटी शेतकऱ्याकडून प्रती क्विंटल १०० रुपये वसूल केले जात असल्याने शेतकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे.

'Grading' farmers' landmark | ‘ग्रेडींग’चा शेतकऱ्यांना भुर्दंड

‘ग्रेडींग’चा शेतकऱ्यांना भुर्दंड

वाशी : येथील बाजारसमिती आवारात असलेल्या तूर खरेदी केंद्रावर केंद्र चालकाने आधुनिक ग्रेंडिग चाळणी आणली आहे. परंतु, याचे भाडे, हमाली आदी खर्चापोटी शेतकऱ्याकडून प्रती क्विंटल १०० रुपये वसूल केले जात असल्याने शेतकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे.
या खरेदी केंद्रावर १४ फेब्रुवारीपर्यंत माप झालेल्या शेतकऱ्यांना एक कोटी रूपये वाटप करण्यात आले असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली. दरम्यान, तूर खरेदी केंद्रावर चाळणी व हमालीच्या नावाखाली गेल्या आठवड्यापर्यंत प्रतिक्विंटल ३० ते ३५ रूपये घेण्यात येत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी येथे आधुनिक ग्रेंडिग चाळणी आणली असून, या चाळणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तुरीचे ग्रेडींग करण्यात येत आहे. या मशिनमधून शेतकऱ्यांचे नुकसान कमी होत असल्याचे कंपनीचे प्रतिनिधी महेश इंगळे यांनी सांगितले. मात्र, या मशिनसाठी डिझेलचा खर्च, हमालीचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहे. यासाठी प्रति क्विंटल १०० रूपये शेतकऱ्यांकडून वसूल केले जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात इंगळे यांना विचारणा केली असता त्यांनीही यास दुजोरा दिला. मार्केटींग फेडरेशनचे व्यवस्थापक आबासाहेब मगर यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

Web Title: 'Grading' farmers' landmark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.