ग्रा.पं. निवडणुकांचा वाजला बिगूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:48 IST2017-09-02T00:48:30+5:302017-09-02T00:48:30+5:30
ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला असून, जिल्ह्यातील ७०३ ग्रामपंचायतसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

ग्रा.पं. निवडणुकांचा वाजला बिगूल
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला असून, जिल्ह्यातील ७०३ ग्रामपंचायतसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१७ या दोन महिन्यात मुदत संपणाºया ग्रा.पं. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. एक सप्टेंबरपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. सदरील निवडणूक दोन टप्प्यात घेण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात औरंगाबाद महसूल विभागातील जिल्ह्यांचा समावेश आहे. निवडणुकीची सूचना ७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. १५ ते २२ सप्टेंबर उमेदवारी दाखल करता येतील. २५ सप्टेंबर रोजी छाननी होईल. ७ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. ९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होतील. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच उत्साही मंडळीनी एकमेकांना मोबाईलवरून माहिती देत चौकशी करण्यास सुरूवात केली होती.