गोविंदांची तयारी जोरात

By Admin | Updated: August 10, 2014 23:50 IST2014-08-10T23:48:17+5:302014-08-10T23:50:57+5:30

गोविंदांची तयारी जोरात

Govind's preparation is loud | गोविंदांची तयारी जोरात

गोविंदांची तयारी जोरात

भास्कर लांडे हिंगोली
एकमेकांच्या आधारावर मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी हिंगोलीतील गोविंदांनी जोरात तयारी सुरू केली आहे. गोकुळाष्टमीला आठ दिवसांचा अवधी असल्याने शिंकाळ्यातील दही खाण्यासाठी व्यायामशाळेतील पहेलवान गोविंदा मनोऱ्यावर मनोरे रचून सराव करताना दिसत आहेत.
राज्यभरात मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमीचा सण साजरा केला जातो. गणेशोत्सवाप्रमाणे या सणाची महानगरात विशेष तयारी केली जाते. हळूहळू ग्रामीण भागातही हे लोण पोहोचल्याने हिंगोली त्याला अपवाद राहिला नाही. अलिकडच्या पाच वर्षांपासून हिंगोलीत दहीहंडीची संख्या वाढताना दिसते. पूर्वी बद्रीनारायण मंदिराची एकमेव दहीहंडी होती. चार मनोऱ्याच्या येथील दहीहंडीला जवळपास ३० वर्षांपासूनची परंपरा आजतागायत सुरू ठेवली. त्यानंतर पोस्ट आॅफीस रोडवर सात वर्षांपूर्वी दहीहंडी सुरू झाली. दोेन्ही दहीहंडी फोडण्यासाठी हनुमान व्यायाम शाळेतील मल्लांनी आठ दिवसांपूर्वी सरावास सुरूवात केली. मुळात पहेलवान असल्याने येथील गोविंदांना तयारीस भरपूर वेळ देण्याची आवश्यकता भासत नाही. अनुभवी मल्ल आणि पुर्वानुभव असताना चढणे, उतरणे, तोल सांभाळणे आदी सराव गोविंदा व्यायामशाळेत करतात. दुसरीकडे राजस्थान व्यायामशाळेच्या दहीहंडीसाठी येथील गोविंदा सरावाला लागले. यंदाचे पाचवे वर्ष असल्याने येथील गोविंदांना चार मनोरे तयार करावे लागणार आहेत. येथील गोविंदांत पहेलवानांचा अधिक समावेश असल्याने कठोर मेहनतीची गरज नसल्याचे पहेलवान सागर खंडेलवाल यांनी सांगितले. मध्यंतरी दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा नव्याने भुषण देशमुख यांनी शिवाजी नगरवासियांचा उत्साह वाढवला. उंच मनोरे आणि स्पर्धांपेक्षा शिस्तबद्ध पद्धतीने दहीहंडी फोडण्याचे वैशिष्ट आजही येथे जपले जाते. येथील गोविंदा जिम्नॅशियमचे खेळाडू असल्याने चार मनोऱ्याची दहीहंडी फोडण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार नाही. अधिक उत्साह आणि सार्वजनिक उपक्रम म्हणून नांदेड येथील गोविंदा पथक आणण्यासाठी बोलणी सुरू असल्याचे देशमुख म्हणाले. शिवाय गाडीपुरा, रिसाला बाजार, मारवाडी गल्ली, मंगळवारा, टाले हॉल, गोलंदाज गल्ली, महात्मा गांधी चौक, उत्साहात दहीहंडी फोडतात.

Web Title: Govind's preparation is loud