आबालवृद्धांनी अनुभवला गोविंदांचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:18 AM2017-08-17T01:18:53+5:302017-08-17T01:18:53+5:30

‘गोविंदा, गोविंदा, गोविंदा’चा उदंड जयघोष, डीजेवरील रिमिक्सची धून अशा जल्लोषपूर्ण वातावरणात गोविंदा पथके जेव्हा थरावर थर रचत मानवी मनोरा तयार करीत होते तेव्हा प्रत्येक जण श्वास रोखून तो थरार अनुभवत होते.

Govind thunders experience by the elderly | आबालवृद्धांनी अनुभवला गोविंदांचा थरार

आबालवृद्धांनी अनुभवला गोविंदांचा थरार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘गोविंदा, गोविंदा, गोविंदा’चा उदंड जयघोष, डीजेवरील रिमिक्सची धून अशा जल्लोषपूर्ण वातावरणात गोविंदा पथके जेव्हा थरावर थर रचत मानवी मनोरा तयार करीत होते तेव्हा प्रत्येक जण श्वास रोखून तो थरार अनुभवत होते. कुठे ६ तर कुठे ७ थर रचण्यात काही गोविंदा पथके यशस्वी झाले. दहीहंडी फोडताच उपस्थित ध्वजारोहण बेधुंद नृत्य करीत आनंदोत्सव साजरा करीत होते.
शहरातील ३० पेक्षा अधिक गोविंदा पथकांनी मंगळवारची सायंकाळ गाजविली. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसºया दिवशी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागांत सुमारे ४५ ठिकाणी लहान-मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील प्रमुख कॅनॉट प्लेस, आविष्कार चौक, टीव्ही सेंटर, गुलमंडी, गजानननगर आदी ठिकाणच्या दहीहंडी सर्वांच्या आकर्षण ठरल्या. ५० वर्षांची गोविंदा पथकाची परंपरा असलेल्या जबरे हनुमान मंडळाने जाधवमंडीत ७ थर रचत दहीहंडी फोडून जल्लोष केला. या मंडळाने नंतर शहरातील अनेक दहीहंडी फोडल्या. कॅनॉट प्लेस येथे नगरसेवक प्रमोद राठोड आयोजित स्वाभिमानी दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी हजारो आबालवृद्धांनी गर्दी केली होती. जागा मिळेल तेथे उभे राहून मानवी मनोरांचा थरार सारेजण अनुभवत होते. या ठिकाणी २७ गोविंदा पथकांनी सलामी दिली. अखेरीस भवानीनगरच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. टीव्ही सेंटर चौकात चोहोबाजूने नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. यामुळे गोविंदा पथकांचा उत्साह आणखी द्विगुणित होत होता. येथे अनेक मंडळांना ५ थरांपर्यंतच मजल मारता आली. अनेक पथके सलामी देऊन पुढील दहीहंडी फोडण्यासाठी जात होते. हर्सूल येथील हरसिद्धी गोविंदा पथक, जय भोले गोविंदा पथक, जबरे हनुमान गोविंदा पथक यांनी सहा थर लावून येथे सलामी दिली. येथे अखेरीस खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. आविष्कार कॉलनी चौकातील संस्कृती दहीहंडी महोत्सवातही एकाही पथकाला दहीहंडीपर्यंत पोहोचता आले नाही. येथे रात्री १० वाजता बेगमपुरा येथील राजे संभाजी पथकाने दहीहंडी फोडली. पुंडलिकनगर येथे आ.अतुल सावे यांनी ‘नमो ’ दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले होते. येथेही भवानीनगर गोविंदा पथकाने बाजी मारत दहीहंडी फोडली. या दहीहंडी सोहळ्यात सर्वांचे आकर्षण राहिली ती अभिनेत्री सुरुची आडारकर तसेच गायक अरविंद्र सिंग.
सिडको एन-५ येथील बजरंग चौकातही दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. याठिकाणी जयभद्रा गोविंदा पथकाने बाजी मारत दहीहंडी फोडून जल्लोष केला. याशिवाय सिडकोतील अनेक कॉलन्यांमध्ये बच्चे कंपनीने दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडी महोत्सवाचा स्थानिक रहिवाशांनी आनंद लुटला.

Web Title: Govind thunders experience by the elderly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.