औरंगाबादचे गोविंद शर्मा भारतीय खो-खो महासंघाच्या कार्यकारिणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST2020-12-17T04:32:35+5:302020-12-17T04:32:35+5:30
माजी राष्ट्रीय खेळाडू असलेले गोविंद शर्मा हे जिल्हा खो-खो संघटना व जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे सचिव आहेत. गोविंद शर्मा यांनी ...

औरंगाबादचे गोविंद शर्मा भारतीय खो-खो महासंघाच्या कार्यकारिणीवर
माजी राष्ट्रीय खेळाडू असलेले गोविंद शर्मा हे जिल्हा खो-खो संघटना व जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे सचिव आहेत. गोविंद शर्मा यांनी २०१८ मधये वर्षांपूर्वी नेपाळ दौऱ्यावर गेलेल्या भारतीय खो-खो संघाचे प्रशिक्षकपदही भूषवलेले आहे. त्याचप्रमाणे केरळ येथे २०१४-१५ मध्ये झालेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापकपद भूषवले आहे. त्यांच्या निवडीबद्दल राज्य संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, औरंगाबाद जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे, डॉ. दिपक मसलेकर, युसूफ पठाण, रमेश भंडारी, गंगाधर मोदाळे, रवींद्र दरंदले, गणेश बनकर, ज्ञानदेव मुळे, कैलास पटणे, दीपक सपकाळ, श्रीपाद लोहकरे, शेखर जाधव, योगेश सोळुंके, योगेश मुंगीकर, विकास सूर्यवंशी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.