छत्रपती संभाजीनगर : किडनीदान आणि प्रत्यारोपणासाठी सरकारी समिती पडताळणी करून परवानगी देते. मात्र, प्रत्यक्ष प्रत्यारोपण झाल्यानंतर ज्या व्यक्तीने किडनीदानासाठी संमती दिली होती, त्याच दात्याची किडनी वापरण्यात आली का?, याची स्वतंत्र पडताळणी प्रत्योरोपणानंतर सरकारी यंत्रणेकडून होत नसल्याचे पुढे येत आहे. किडनीदानापूर्वी कडक नजर ठेवणारी यंत्रणा प्रत्यारोपणानंतर मात्र मर्यादित भूमिकेत दिसत आहे.
रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला किडनी देण्यासाठी बहुतांश खासगी रुग्णालय स्तरावरच प्रक्रिया होते. अशा वेळी नियमानुसार सर्व पडताळणी रुग्णालय स्तरावरच होते. रक्ताचे नाते नसलेली व्यक्ती किडनी देणार असेल, दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील सदस्य एकमेकांना किडनी देणार असतील (स्वॅप), तर घाटीतील समितीकडून परवानगी घ्यावी लागते. किडनीदान, प्रत्यारोपणालादेखील ही समिती पैशांचा व्यवहार, दात्यावर कोणताही दबाव नसल्याची पडताळणी करून परवानगी देते.
प्रत्यारोपणानंतर सरकारी रुग्णालयात व्हावी तपासणीपरवानगी दिल्यानंतर ज्या दात्याची किडनी गरजू रुग्णाला दिली आहे, त्या दात्याची आरोग्य तपासणी ही सरकारी यंत्रणेने सरकारी रुग्णालयात केली पाहिजे. प्रत्यारोपणानंतर सदर दात्याला एकच किडनी आहे आणि त्याची प्रकृती चांगली आहे, हे सरकारी यंत्रणेने शिक्कामोर्तब करावे. त्यातून गैरप्रकाराला आळा बसेल, असे आरोग्य विभागातीलच सूत्रांनी सांगितले.
१७ रुग्णालयांत प्रत्यारोपणशहरातील १७ रुग्णालयांत किडनी, लिव्हर, हृदय, नेत्र या अवयवांच्या प्रत्यारोपणाची प्रक्रिया होते.
आमच्या अंतर्गत नाही‘लाइव्ह डोनर’मधील किडनीदाता व रुग्णासंदर्भात पडताळणी करून प्रत्यारोपणासाठी परवानगी दिली जाते. काही रुग्णालयांना त्यांचे अधिकार आहेत. प्रत्यारोपण प्रक्रियेनंतर परवानगी दिलेल्या दात्याचीच किडनी घेतली का, ही पडताळणी करणे आमच्या अंतर्गत नाही.-डाॅ. सुचिता जोशी, अध्यक्ष, ऑर्गन ट्रान्सप्लांट कमिटी व वैद्यकीय अधीक्षक, घाटी
महिन्याला रिपोर्टअवयवदानासंदर्भात महिन्याला अहवाल येतो. घाटीतील ऑर्गन ट्रान्सप्लांट कमिटीचे आम्ही सदस्य आहोत. या कमिटीकडून परवानगी देताना इन कॅमेरा प्रक्रिया केली जाते. कुठे चुकीचे होत असेल तर आम्ही चौकशी करू.-डाॅ. कांचन वानेरे, आरोग्य उपसंचालक
शासनाला माहिती जातेनात्यातील व्यक्तीला किडनीदान व प्रत्यारोपणाची प्रक्रिया ही खासगी रुग्णालय स्तरावर होते. त्यासाठी आवश्यक ती सर्व पडताळणी होते. खासगी रुग्णालयांत होणाऱ्या किडनीदान व प्रत्यारोपणाविषयी सर्व माहिती शासनास जाते.-डाॅ. सुधीर कुलकर्णी, किडनी विकारतज्ज्ञ व माजी अध्यक्ष, ‘झेडटीसीसी’
Web Summary : Government scrutiny for kidney donation is strict initially, but post-transplant verification lacks. Concerns arise about ensuring the correct kidney is used and donor health is monitored after the procedure, potentially leading to loopholes.
Web Summary : किडनी दान के लिए सरकारी जाँच सख्त है, पर प्रत्यारोपण के बाद सत्यापन कम है। सही किडनी का उपयोग और दाता के स्वास्थ्य की निगरानी सुनिश्चित करने में चूक से गैरकानूनी गतिविधियों की आशंका है।