शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची मदतीची घोषणा फसवी, शेतकऱ्यांच्या हातात दमडीही नाही; पुन्हा कर्ज घेण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:59 IST

खुलताबादेतील २७ हजार शेतकऱ्यांना दमडीही नाही

- दिलीप मिसाळगल्लेबोगाव (ता. खुलताबाद) : तालुक्यात १ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पंचनामे पूर्ण होऊनही, बुधवारपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसानभरपाईचा एक रुपयाही जमा झालेला नाही. त्यामुळे हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, राज्य शासनाची दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा फसवी ठरल्याचे शेतकरी सांगत आहेत.

तालुका प्रशासनाने राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार तालुक्यातील ७३ गावांमधील २७ हजार ८७२ शेतकऱ्यांच्या ३१ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी तहसील प्रशासनाने शासनाकडे २९ कोटी १५ लाख रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. राज्य शासनाने दिवाळीपूर्वी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम थेट जमा करण्याची घोषणा केली होती; परंतु एक रुपयाही शासनाने अद्याप तालुक्याला दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

मदत मिळालीच पाहिजेपंचनामे झालेत; पण काहीच निष्पन्न नाही. पिकांचं नुकसान झालं, मदत मिळालीच पाहिजे. अधिकारी आले, फोटो काढले; पण त्यानंतर काहीच हालचाल नाही. शेतकरी फसत आहेत.- राहुल चंद्रटिके, शेतकरी, गल्लेबोरगाव

तीन दिवसांत मदतआताच शासनाचा जीआर प्राप्त झाला आहे. आम्ही दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणार आहोत. येत्या दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.- स्वरूप कंकाळ, तहसीलदार

आता पुन्हा कर्ज काढण्याची वेळनुकसान होऊन महिना उलटला तरी मदत मिळाली नाही. शासनाने केलेली घोषणा फसवी ठरली आहे. हातात पैसे नसल्यामुळे आमची दिवाळी अंधारात गेली, आता पुढील शेतीच्या कामांसाठी कर्ज काढण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.

English
हिंदी सारांश
Web Title : False promise of government aid leaves farmers in debt.

Web Summary : Farmers in Khultabad face financial hardship after unfulfilled government aid promises for crop damage. Despite assessments, no funds have been received, forcing them to borrow again for farming.
टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर