शासकीय तंत्रनिकेतनबाबत पुनर्विचार करणार - वायकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2016 00:30 IST2016-11-11T00:26:08+5:302016-11-11T00:30:40+5:30
जालना : जालना येथील तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय झाला असला तरी या निर्णयावर पुनर्विचार करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी येथे सांगितले.

शासकीय तंत्रनिकेतनबाबत पुनर्विचार करणार - वायकर
जालना : जालना येथील तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय झाला असला तरी या निर्णयावर पुनर्विचार करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी येथे सांगितले.
जालना शहराजवळील तंत्रनिकेतनमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय औरंगाबादच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. मात्र, अभियांत्रिकी महाविद्यालय येथे कायम राहिले पाहिजे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे वायकर म्हणाले.
जालना तंत्रिनकेतनमधील असुविधांबाबत विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. विद्यालयाची पाहणी करण्यासाठी वायकर गुरुवारी सकाळीच येथे पोहोचले. यावेळी आ. सतीश चव्हाण यांचीही उपस्थिती होती. याप्रसंगी वायकर यांनी संपूर्ण परिसराची तसेच येथील वसतिगृहाची पाहणी केली. विद्यार्थ्यांनीही भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. तर प्रशासनाने पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. त्यावर राज्यमंत्री खोतकर यांनीही डीपीसी निधीतून तरतूद करुन पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात तंत्रनिकेतनच्या प्रशासनाने प्रस्ताव द्यावा आपण या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु , असे मंत्री वायकर म्हणाले. सहायक संचालक महेश शिवणकर, प्राचार्य एस. आर. नवले, बांधकाम विभागाचे अभियंता बेलापट्टे उपस्थित होते. (प्रतिनिधी)