सरकारने मराठा आरक्षणाची तातडीने करावी अंमलबजावणी

By Admin | Updated: June 27, 2014 01:03 IST2014-06-27T00:52:32+5:302014-06-27T01:03:49+5:30

औरंगाबाद : ‘राज्य सरकारने घेतलेला मराठा आरक्षणाचा निर्णय आम्हाला मान्य आहे.

The government should implement the Maratha reservation urgently | सरकारने मराठा आरक्षणाची तातडीने करावी अंमलबजावणी

सरकारने मराठा आरक्षणाची तातडीने करावी अंमलबजावणी

औरंगाबाद : ‘राज्य सरकारने घेतलेला मराठा आरक्षणाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. सरकारने आता या निर्णयाची नीट अंमलबजावणी करावी’अशा मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया भारिप- बहुजन महासंघाचे नेते व माजी खासदार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
अ‍ॅड. आंबेडकर यांच्या प्रतिक्रियेकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले होते. या प्रतिनिधीने मोबाईलद्वारे संपर्क साधून प्रतिक्रिया घेतली असता, अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सरकारचा हा निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले.
अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची मराठा आरक्षणासंबंधीची भूमिका यापूर्वीही वारंवार जाहीर झाली आहे. मोगलाई मराठा आणि रयत मराठा असा भेद करून अ‍ॅड. आंबेडकरांनी रयत मराठ्यांचे खरे शोषक मोगलाई मराठ्यांनीच केला असल्याचा त्यांचा आरोप होता.
दरम्यान, मराठा आरक्षण स्वतंत्र दिले असले तरी त्याचा ओबीसी आरक्षणावर काही परिणाम होऊ शकतो का, या मुद्यावरही दिवसभर चर्चा होत होती. काही जाणकारांच्या मते ओबीसी आरक्षणावर मराठा आरक्षणाचा प्रचंड परिणाम होऊ शकतो. (लोकमत ब्युरो)
फटाके फोडून व पेढे वाटून स्वागत...
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे टीव्ही सेंटर येथे फटाके फोडून व पेढे वाटून मराठा आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रा. माणिक शिंदे, अभिषेक देशमुख, शैलेश भिसे, भरत कदम, विजय म्हस्के, संदीप फाजगे पाटील, विजय घोगरे, गणेश थोरात, गणेश वडकर, हनुमंत कदम, संदीप शेळके, सुनील औटे, दीपक खोसरे, अशोक वैद्य, सलीम डांगे, वैशाली पाटील, लता पाटील, अ‍ॅड. सुरेश काळे, हाशम पटेल, अशोक दामले, भानुदास डक, अजिंक्य ढवळे आदींचा सहभाग राहिला.

Web Title: The government should implement the Maratha reservation urgently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.