शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षण न दिल्यास सरकारचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:06 IST

मागच्या सरकारने धनगरांना आरक्षण दिले नाही. त्या सरकारची माती झाली. आता हेही सरकार धनगरांना आरक्षण देत नाही. विलंब करीत आहे. या सरकारचेही काय करायचे हे लवकरच दिसेल... मागच्या तीन महिन्यांपासून जय मल्हार सेना याची तयारी करीत आहे, असा स्पष्ट इशारा यानिमित्ताने सेनेचे प्रमुख लहुजी शेवाळे यांनी दिला.

ठळक मुद्देऔरंगाबादेत इशारा : अहिल्यादेवी होळकर जयंती मिरवणुकीनिमित्त आरक्षणाचा मुद्दा ठरला महत्त्वाचा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. ती साजरी करीत असतानाच धनगर आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. धनगर समाजाच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा. मागच्या सरकारने धनगरांना आरक्षण दिले नाही. त्या सरकारची माती झाली. आता हेही सरकार धनगरांना आरक्षण देत नाही. विलंब करीत आहे. या सरकारचेही काय करायचे हे लवकरच दिसेल... मागच्या तीन महिन्यांपासून जय मल्हार सेना याची तयारी करीत आहे, असा स्पष्ट इशारा यानिमित्ताने सेनेचे प्रमुख लहुजी शेवाळे यांनी दिला.पैठणगेटपासून निघालेल्या अहिल्यादेवी होळकर जयंती मिरवणुकीचा समारोप रात्री कोकणवाडी येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्याजवळ झाला. यावेळी आमदार संजय शिरसाट, मनपा सभागृह नेते विकास जैन व माजी सहकार संचालक डॉ. सुभाष माने यांची प्रमुख उपस्थिती होती. मिरवणुकीतील डफ स्पर्धेची बक्षिसेही या पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. गंगापूर तालुक्यातील मांजरीच्या डफ संघास व फुलंब्री तालुक्यातील आडगावच्या संघास ही रोख बक्षिसे देण्यात आली. या दोन संघांनी बक्षीस स्वीकारण्यापूर्वी आपला परफॉर्मन्स दाखवला व येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात त्यांना उपस्थितांनी प्रतिसाद दिला.मीराबाई सोनवणे, चंद्रशेखर गायके, विठ्ठलराव सोनवणे, रंजना बोरसे, गयाबाई साबळे, विनोद सोनवणे, बंटी सोनवणे, धुराजी तांबे, उत्सव समितीचे यंदाचे अध्यक्ष तुळशीदास खटके, दत्ता मेहत्रे, अभिषेक कोरे आदींची उपस्थिती होती.आरक्षण मिळवून घ्या...आ. संजय शिरसाट यांनी भाषण करताना धनगर समाजाला सल्ला दिला की, आरक्षण मिळवून घ्या. हा धागा पकडून शेवाळे यांनी या सरकारलाही पुढील परिणामांचा इशारा दिला व शिरसाट यांच्या खांद्यावरच बंदूक ठेवून आम्हाला आरक्षण घ्यायचे आहे, असे सूचित केले. राज्यकर्त्यांनी सामान्य माणसांची दखल कशी घ्यायची याचा आदर्श अहिल्यादेवी होळकर यांच्यापासून घ्यावा, असा सल्ला डॉ. सुभाष माने यांनी यावेळी दिला.

टॅग्स :SocialसामाजिकAurangabadऔरंगाबादreservationआरक्षण