‘लोकमत’च्या गाईडन्सने व्हा सरकारी अधिकारी
By Admin | Updated: May 19, 2015 00:51 IST2015-05-19T00:26:39+5:302015-05-19T00:51:14+5:30
औरंगाबाद : प्रत्येकाचे आयुष्यात काही ना काही बनण्याचे स्वप्न असते. आयुष्यात चांगले करिअर घडविण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते.

‘लोकमत’च्या गाईडन्सने व्हा सरकारी अधिकारी
औरंगाबाद : प्रत्येकाचे आयुष्यात काही ना काही बनण्याचे स्वप्न असते. आयुष्यात चांगले करिअर घडविण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यातल्या त्यात आठवी, नववी, दहावी सुरू झाली की लगेच पालकही पाल्याच्या करिअरविषयी जागरूक होतो आणि पाल्यही. त्यापुढचा टप्पा म्हणजे दहावीनंतरचा.
आता दहावी झाली की पुढे काय करायचे, असा प्रश्न प्रत्येक आई-वडिलांना आणि विद्यार्थ्याला पडतो; पण या सगळ्या प्रश्नांचे समाधान करण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट आणि युनिक अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यूपीएसी आणि एमपीएससी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची, त्यातल्या करिअरच्या संधी याविषयी चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
हे सेमिनार २३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता लोकमत हॉल, लोकमत भवन, जालना रोड, औरंगाबाद येथे आयोजित केले आहे. यासाठी प्रवेश मागच्या गेटने आहे. विशेष म्हणजे हे चर्चासत्र मोफत आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी माहिती देण्यासाठी त्या- त्या विषयांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
४याविषयी सविस्तर माहिती तर ते देणार आहेतच; पण त्याशिवाय आपण आपल्या मनातील प्रश्न त्यांना विचारू शकता. काय मग मित्रांनो, टेन्शन द्या सोडून आणि व्हा तयार आॅफिसर्स बनण्यासाठी.