शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

सरकारी मध्यस्थीने ‘समांतर’चा प्रवास सुरु करण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 14:04 IST

समांतर जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या मध्यस्थीने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला पुन्हा प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या मध्यस्थीने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला पुन्हा प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

कंपनीशी निगडित काही नेते  सत्ताधाऱ्यांच्या नजीक आहेत. त्यामुळे राज्य शासन, मनपा आणि कंपनीत निर्माण झालेल्या वादाचे ‘लवाद’ म्हणून मुख्य भूमिका बजावेल, मनपा, कंपनीतील वादावर तोडगा काढून ती योजना पुन्हा औरंगाबादकरांवर लादली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घडामोडीनंतर शिवसेना सावध भूमिका घेतली आहे. 

२२ मार्च रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी, पालिका आणि युटिलिटी कंपनी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पालिकेचे प्रभारी आयुक्त नवल किशोर राम तसेच  आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, आ. इम्तियाज जलील आदींची बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीनंतर एसीडब्ल्यूयूएल कंपनीने नियुक्त केलेले सेवानिवृत्त सनदी अधिकारी जीवन सोनवणे यांनी पालिका पदाधिकारी आणि आयुक्तांची भेट घेत समांतरचा नवीन प्रस्ताव ठेवल्याचे महापौर घोडेले यांनी गुरुवारी सांगितले. आगामी आठ-दहा दिवसांत मंत्रालयात पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे  बैठक होणार असून, त्यात पुढील धोरण ठरेल. तत्पूर्वी, आयुक्तांशी चर्चा करून पालिकेचीही भूमिका या बैठकीत मांडण्यासाठी निश्चित केली जाणार आहे. 

जीएसटीचा  तोडगा कोण काढणार कंपनीच्या प्रस्तावात करारातील अटी शिथिल करण्यास अनुकूलता दर्शविली असली तरी जुन्या करारात व्हॅट व इतर शासकीय करात बदल झाल्यास ती रक्कम पालिकेला भरावी लागेल, असे नमूद आहे. १ जुलै २०१७ पासून जीएसटीमुळे योजनेची किंमत ७९ कोटींनी वाढली आहे. तो कर पालिकेने द्यावा, असे कंपनीने प्रस्तावात म्हटले आहे. यावर शासनाने तोडगा काढवा, अशी पालिकेची भूमिका आहे. समांतर पीपीपीवरच पूर्ण घ्यायची काय, यावर महापौर म्हणाले, जे चांगले असेल त्यानुसार योजनेचे काम करू. पूर्वीचा करार योग्य होता की अयोग्य यावर भाष्य करणार नसल्याची सावध भूमिका महापौरांनी घेतली.  शासनाने दिलेल्या सूचनांनुसार धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, तो पालिका सभागृहासमोर ठेवून सर्वांना विश्वासात घेऊनच समांतरचा नव्याने करार केला जाईल.  

हे प्रश्न भेडसावतात- २१ सप्टेंबर २०११ झालेला करार ७९९ कोटींचा आहे. - ८ वर्षांत महागाई वाढली तरी जुन्याच किमतीने काम का?- समांतरसाठी सभागृहात अंतिम तडजोड होईल का?- अटी व शर्ती पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने व्हाव्यात.- पूर्वीचा करार योग्य की अयोग्य यावर सत्ताधारींचे  मौन- ७९ कोटींचा जीएसटी कोण भरणार?- हायकोर्टातील न्यायप्रविष्ट याचिकांचे काय?- कंपनीने दिलेला प्रस्ताव असा- कंपनी अडीच वर्षांत काम पूर्ण करील.- योजनेच्या एकूण किमतीत वाढ करणार नाही.- योजना पूर्ण होईपर्यंत पाणीपट्टी वाढविणार नाही.- योजना पीपीपीवर की इतर पर्यायाने करायची हे स्पष्ट नाही.- कंपनी मनपाला नव्याने प्रस्ताव सादर करणार आहे.- २४ तास पाणीपुरवठा, तिसऱ्या मजल्यावर पाणी जाईल. - सर्वाेच्च न्यायालयाबाहेर तडजोडीसीठी तयारी 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजनाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादNavalkishor Ramनवलकिशोर राम