शासकीय रुग्णालयांना मिळावे ‘काॅर्पोरेट लूक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:05 IST2021-09-27T04:05:07+5:302021-09-27T04:05:07+5:30
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नाॅन कोविड रुग्णसेवा वाढविण्यास प्राधान्य देण्यात यावे. शासकीय रुग्णालयांना ‘काॅर्पोरेट लूक’ मिळावा. त्यासाठी ...

शासकीय रुग्णालयांना मिळावे ‘काॅर्पोरेट लूक’
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नाॅन कोविड रुग्णसेवा वाढविण्यास प्राधान्य देण्यात यावे. शासकीय रुग्णालयांना ‘काॅर्पोरेट लूक’ मिळावा. त्यासाठी देखभाल-दुरुस्ती, स्वच्छतेवर भर देण्याची गरज आहे, अशी सूचना आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी रविवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयातील बैठकीत अधिकाऱ्यांना केली.
बैठकीस आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. डाॅ. साधना तायडे यांनी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांतील आरोग्य सेवा आणि सोयी-सुविधांचा आढावा घेतला. अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. काही ठिकाणी रुजू होण्यास नकार दिला जात आहे. निविदा प्रक्रियेअभावी स्वच्छेतासाठी कर्मचारी उपलब्ध होत नाहीत, तर कायमस्वरुपी वर्ग-४ चे कर्मचारी झाडूही मारत नाहीत. त्यामुळे देखभाल दुरुस्ती, स्वच्छतेच्या कामात अडचणी येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा अधिकाधिक गोरगरीब रुग्णांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना डाॅ. तायडे यांनी केली.