शासकीय रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा
By Admin | Updated: August 20, 2014 23:54 IST2014-08-20T23:48:20+5:302014-08-20T23:54:05+5:30
नांदेड: नांदेडातील जवळपास २०० कोटींच्या पाच कामांचे गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे़

शासकीय रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा
नांदेड: नांदेडातील जवळपास २०० कोटींच्या पाच कामांचे गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे़ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आऱआऱपाटील, उद्योगमंत्री नारायण राणे, परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे़
शिवाजीनगर येथील उद्योग भवनचे सकाळी ९ वाजता, सेफ सिटी प्रकल्पाचे ९ वा़३० मिनिटांनी, गोदावरी नदीवरील पुलाच्या बांधकामाचे १० वाजता भूमिपुजन होणार आहे़ तर एमआयडीसी परिसरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे १० वा़३० मिनिटांनी तर विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे ११ वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे़ कार्यक्रमाला पालकमंत्री डी़पी़सावंत, जि़प़अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, महापौर अब्दूल सत्तार, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर यांची उपस्थिती राहणार आहे़ कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत, अधिष्ठाता डॉ़दिलीप म्हैसेकर, मुख्य अभियंता एम़पी़पुराणीक, आयुक्त डॉ़निशिकांत देशपांडे, परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)