सरकारी दसरा महोत्सव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 23:58 IST2017-09-19T23:58:13+5:302017-09-19T23:58:13+5:30
येथील सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या विविध समित्यांची धुरा अखेर अधिकाºयांच्याच खांद्यावर टाकण्यात आली. स्थानिकांना यात संधी देणेच बंधनकारक नसले तरीही निदान प्रदर्शन व इतर बाबींना गती मिळणे अपेक्षित असताना त्याचा पत्ता दिसत नाही

सरकारी दसरा महोत्सव!
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या विविध समित्यांची धुरा अखेर अधिकाºयांच्याच खांद्यावर टाकण्यात आली. स्थानिकांना यात संधी देणेच बंधनकारक नसले तरीही निदान प्रदर्शन व इतर बाबींना गती मिळणे अपेक्षित असताना त्याचा पत्ता दिसत नाही.
घटस्थापनेच्या दिवसापासून खºया अर्थाने दसरा महोत्सवात चहल-पहल जाणवत असते. त्यासाठी मोठे झोके व इतर बाबींची तयारी तर पाच ते सहा दिवस अगोदरच सुरू होते. मात्र यंदा अजूनही मैदानावर तसे काही दिसत नाही. विशेष म्हणजे याच बाबींचे नियोजन करण्यासाठी काल बैठक झाली. या बैठकीस आ.तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांचीही उपस्थिती होती. मात्र त्यांच्या साक्षीनेच अधिकाºयांनी दसरा महोत्सवाचे सरकारीकरण करून टाकले. आता त्याला कोणाचा उजर असण्याचे कारण नाही. मात्र माझे मूळ काम शासकीय नोकरी आहे, दसरा महोत्सव नाही, ही भूमिका असल्यास हा उत्सव कशा पद्धतीने होणार? हा प्रश्नच आहे. रुपरेषाही नीटपणे स्पष्ट होत नाही. त्यामुळे सार्वजनिकऐवजी सरकारी दसरा महोत्सव असे नामकरण करा, असा टोलाही मारला जात आहे.