फुलंब्रीत शासकीय कापूस खरेदी ६ डिसेंबरपासून
By | Updated: December 4, 2020 04:08 IST2020-12-04T04:08:20+5:302020-12-04T04:08:20+5:30
तालुक्यात यंदा कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी झालेले असून शासकीय कापूस खरेदी केंद्र लवकर सुरु होत नसल्याने अनेक गरजू शेतकऱ्यांनी खाजगी ...

फुलंब्रीत शासकीय कापूस खरेदी ६ डिसेंबरपासून
तालुक्यात यंदा कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी झालेले असून शासकीय कापूस खरेदी केंद्र लवकर सुरु होत नसल्याने अनेक गरजू शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावाने कापूस विकून टाकला. मात्र, आता खरेदी केंद्राला मुहूर्त मिळाला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र लवकर सुरु करावी, याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीने वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानुसार येत्या ६ डिसेंबरला शासकीय कापूस खरेदी केंद्र खामगाव फाटा येथील राजेंद्र फायबर या जिनिंगवर सुरुवात होणार आहे.
कोट
शेतकऱ्यांनी नोंदणी करावी
येत्या ६ डिसेंबरला शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु होत असून शेतकऱ्यांनी ३ डिसेंबरपासून बाजार समितीमध्ये नोंदणी करावी. नोंदणीसाठी चालू वर्षाचा सातबारा, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, बँक पासबुक सोबत आणावे.
-चंद्रकांत जाधव, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, फुलंब्री.