यात्रांतील बोकडबळीवर प्रशासनाकडून निर्बंध
By Admin | Updated: February 21, 2016 23:54 IST2016-02-21T23:50:18+5:302016-02-21T23:54:20+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील यात्रांमध्ये सामुहिक बोकडबळी देण्याची वाईट प्रथा बंद करण्याकरीता प्रशासनाने बोकडबळींवर निर्बंध घातले आहेत

यात्रांतील बोकडबळीवर प्रशासनाकडून निर्बंध
हिंगोली : जिल्ह्यातील यात्रांमध्ये सामुहिक बोकडबळी देण्याची वाईट प्रथा बंद करण्याकरीता प्रशासनाने बोकडबळींवर निर्बंध घातले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारी रोजी आदेश काढून यात्रांत सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी घातली आहे.
जिल्ह्यातील कळमनुरी येथील लमानदेव यात्रा, कोथळज व इतर ठिकाण्ी देवाच्या नावाने नवस फेडण्यासाठी यात्रेमध्ये सार्वजनिक ठिकाणी बोकडबळी देण्याची प्रथा आहे. या पशुहत्येमुळे पर्यावरणावर व लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. तसेच जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे यात्रेत मंदिरासमोर तसेच २०० मिटर परिसरात २२ फेब्रुवारी ते ४ एप्रिल दरम्यान कुंडकर पिंप्री, लमानदेव, कोथळज, देवाळा येथील यात्रांमध्ये प्राण्यांच्या कत्तलीवर निर्बंध घालण्यात आला आहे. (प्रतिनिधी)