शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

चोरून लग्न केले, आता बापाला कशाला पैसे मागता; दानवेंची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 5:14 PM

आमचा उमेदवार, आमची जबाबदारी या धोरणाने सर्वांना काम करावे लागणार आहे.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांत हवा भरलीय, आता गाडी पंक्चर होणार नाही

औरंगाबाद : माझे कुटुंब, माझी जबाबदारी यातून मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडले पाहिजे. उठसूट केंद्राकडे पैसा मागता. चोरून लग्न केले. आता संसार चालवा. बापाला कशाला पैसे मागता, असा टोला लगावत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात केलेल्या टीकेला उत्तर दिले. 

तापडिया नाट्यमंदिरात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. माजी मंत्री पंकजा मुंडे, आ. हरिभाऊ बागडे, विजया रहाटकर, आ. संभाजी निलंगेकर, उमेदवार शिरीष बोराळकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. दानवे म्हणाले, ट्रम्प हरले पण मोदी जिंकले. औरंगाबादमध्ये १७ प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांना एकेका वॉर्डात उमेदवारी देतो, हरले की घरी पाठवितो. यांनी चमक दाखविली पाहिजे, नुसते पदे घेऊन काय करणार? आमचा उमेदवार आमची जबाबदारी, हे आमचे धोरण आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. आमचा उमेदवार, आमची जबाबदारी या धोरणाने सर्वांना काम करावे लागणार आहे. कार्यकर्त्यांत हवा भरली असून, आता गाडी पंक्चर होणार नाही, असा दावा केला. त्यांनी संजय केणेकर , खा. डॉ. भागवत कराड यांना शालजोडे मारले. उमेदवार बोराळकर, रहाटकर, बागडे यांनी मार्गदर्शन केले.  समीर राजूरकर यांनी सूत्रसंचालन केले. विजय औताडे यांनी आभार मानले.

...तर आम्ही कार्यकर्त्यांच्या जिवावर प्रवीण घुगे शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. त्यांनी पक्षाच्या सांगण्यावरूनच अर्ज भरला. त्याचेच विरोधकांनी भांडवल केले. प्रदेशाध्यक्षाच्या बैठकीला वैयक्तिक कारणामुळे येता आले नाही. कार्यकर्त्यांनी सत्ता जाऊ देऊ नये. संघर्षाविना काही मिळालेले नाही. विरोधक कर्मचाऱ्यांच्या तर आपण कार्यकर्त्यांच्या भरवशावर आहोत. या मतदारसंघात जातीऐवजी शिक्षणाचा विचार होतो. असा हा मतदारसंघ आहे.  बोराळकर आज विरोधी पक्षात आहेत, उद्या ते सत्तेत येतील. आजचे विरोधक उद्याचे सत्ताधारी होऊ शकतात. असे सुतोवाच माजी मंत्री मुंडे यांनी केले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा