गोरंट्याल यांचा शक्तीप्रदर्शनाने अर्ज
By Admin | Updated: September 26, 2014 01:19 IST2014-09-26T00:53:26+5:302014-09-26T01:19:46+5:30
जालना : जालना विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आ. कैलास गोरंट्याल यांनी गुरुवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

गोरंट्याल यांचा शक्तीप्रदर्शनाने अर्ज
जालना : जालना विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आ. कैलास गोरंट्याल यांनी गुरुवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान निवडणुकीसाठी नामनिर्देशपत्र भरण्याचे अखेरचे दोन दिवस राहिले आहेत. या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाऊगर्दी होईल, अशी चिन्हे आहेत.
गुरूवारी जालना मतदारसंघातून चार उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यामध्ये काँग्रेसतर्फे कैलास किशनराव गोरंट्याल, अपक्ष म्हणून रणजित विश्वनाथ रत्नपारखे, गणेश शेषराव क्षीरसागर, शेख गुलामनबी चाँद यांचा समावेश आहे. या मतदारसंघात आतापर्यंत ९९ जणांनी २१७ नामनिर्देशन पत्रांची खरेदी केली आहे. भोकरदन मतदारसंघातून अपक्ष म्हणून लक्ष्मण महादू सूरडकर यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. बदनापूर मतदार संघातून गुरुवारी भारिपच्या वतीने तुकाराम शंकर हिवराळे व प्रकाश पंडित मगरे यांनी वेगवेगळे अर्ज दाखल केले. अपक्ष म्हणून ज्ञानेश्वर चंदूलाल कुरील यांनी अर्ज दाखल केला. आ. संतोष सांबरे व माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी हे शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. (प्रतिनिधी)
शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे शुक्रवारी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बसपाचे रशीद पहेलवान, पँथर्स रिपब्लिकनचे संदीप खरात हे ही अर्ज दाखल करणार असून, मनसेचे रवि राऊत २७ रोजी अर्ज दाखल करणार आहेत.
४परतूर मतदारसंघात काँग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया हे शुक्रवारी शक्तीप्रदर्शन करणार असून मनसेकडून उमेदवारी जाहीर झालेले बाबासाहेब आकात हे ही अर्ज दाखल करणार आहेत. घनसावंगी मतदारसंघात २६ रोजी राकाँचे राजेश टोपे हे अर्ज दाखल करणार आहेत. मनसेचे सुनील आर्दड, बसपाचे सूरज उढाण हे २७ रोजी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसचे विष्णू कंटुले हे २६ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
४भोकरदन मतदारसंघात २६ रोजी राकाँचे चंद्रकांत दानवे हे अर्ज दाखल करणार आहेत. २७ रोजी एल.के. दळवी हे अर्ज भरणार आहेत. तर भाजपाचे संतोष दानवे हे २६ रोजी अर्ज भरणार आहेत.