‘गोपीनाथरावांचे विचार प्रेरणादायी’
By Admin | Updated: June 4, 2017 00:29 IST2017-06-04T00:28:36+5:302017-06-04T00:29:56+5:30
परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी शेतकरी, शेतमजुरासाठी संघर्ष केला आहे.

‘गोपीनाथरावांचे विचार प्रेरणादायी’
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी शेतकरी, शेतमजुरासाठी संघर्ष केला आहे. त्यांची प्रेरणा घेऊनच हे राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन उभे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तृतीय स्मृतीदिनी केले. परळीतील गोपनाथगडावर शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षीय समारोप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, आजचा दिवस एकीकडे दु:खाचा तर दुसरीकडे प्रेरणेचा दिवस आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम केले. त्यांची प्रेरणा घेऊन राज्य सरकार काम करीत आहे. गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकरी शेतमजुरांच्या पाठिशी राज्यशासन खंबीरपणे उभा आहे.
वैद्यनाथ साखर कारखाना परिसरातील गोपीनाथगड येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ@खोत, खा. सुनील गायकवाड, खा. प्रीतम मुंडे, प्रज्ञाताई मुंडे, आ.सुजीत सिंह ठाकुर, आ. सुधाकर भालेराव, आ.संगीता ठोंबरे, आ.आर.टी. देशमुख, आ.भीमराव धोंडे, आ.लक्ष्मण पवार, आ.मोनिका राजळे, आ. मोहन फड, आ. तानाजी मुटकुळे, आ. विनायक मेटे, रासप नेते अमित पालवे, माजी आ.गोविंद केंद्रे, माजी आ. केशव आंधळे, माजी आ. पाशा पटेल, माजी आ.विजय गव्हाणे, प्रदेश प्रवक्ता केशव उपाध्ये, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, फुलचंद कराड, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे , रत्नाकर गुट्टे, ज्ञानोबा मुंडे, मोनिका राजुरे, प्रवीण घुगे, परभणी जि.प. सभापती श्रीनिवास मुंडे, रमेश आडसकर, डॉ.हजारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.