लांडग्याने पाडला तीन शेळ्यांसह हरणाचा फडशा

By Admin | Updated: February 13, 2015 00:46 IST2015-02-13T00:32:27+5:302015-02-13T00:46:31+5:30

जाफराबाद : हिवराबळी, हरपाळा, बोरगाव मठ परिसरामध्ये लांडग्यांचा हैदोस वाढला असून, गेल्या दोन दिवसांत हिवराबळी गावात विजय खंदारे यांची १ शेळी

The goose pods with three goats drown by the wolf | लांडग्याने पाडला तीन शेळ्यांसह हरणाचा फडशा

लांडग्याने पाडला तीन शेळ्यांसह हरणाचा फडशा


जाफराबाद : हिवराबळी, हरपाळा, बोरगाव मठ परिसरामध्ये लांडग्यांचा हैदोस वाढला असून, गेल्या दोन दिवसांत हिवराबळी गावात विजय खंदारे यांची १ शेळी व जगदेव खंदारे यांच्या दोन शेळ्या फस्त केल्याचा प्रकार घडला आहे. एवढेच नव्हे तर जंगली प्राणी हरणाचा देखील कर्दनकाळ ठरत आहे.
धामणा नदीच्या पात्रालगत मोठ्या प्रमाणात लपून बसण्यास झुडुपे असल्याने या ठिकाणी लांडगे बसण्यास जागा आहे. शिवाय या परिसरात रबीचे पीक सुद्धा मोठ्या प्रमाणात उभे आहे. परिसरात हरणाचे सुद्धा मोठे कळप असून त्यांचीही शिकार होत आहे.
हरणासारख्या चपळ प्राण्यास लांडगा झडप घालून त्यांच्यावर हल्ला करीत जीव घेत आहे. अशा परिस्थितीत शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. शेतवस्तीवर लांडगे हल्ला करीत आहेत. त्यामुळे या लांडग्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी सरपंच साहेबराव लोखंडे व ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: The goose pods with three goats drown by the wolf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.