सासू-सून संमेलनातून व्यक्त झाले मनातील गूज
By Admin | Updated: August 1, 2014 01:06 IST2014-08-01T00:36:01+5:302014-08-01T01:06:23+5:30
नांदेड : लोकमत सखीमंच आयोजित सासू-सुन हे संमेलन २८ जुलै रोजी शंकरराव चव्हाण सभागृहात उत्साहात संपन्न झाले. यावेळी सासू - सुनेतील व्यक्त झालेल्या भाव- भावनांनी नातेसंबंध अधिकच दृढ झाले़
सासू-सून संमेलनातून व्यक्त झाले मनातील गूज
नांदेड : लोकमत सखीमंच आयोजित सासू-सुन हे संमेलन २८ जुलै रोजी शंकरराव चव्हाण सभागृहात उत्साहात संपन्न झाले. यावेळी सासू - सुनेतील व्यक्त झालेल्या भाव- भावनांनी नातेसंबंध अधिकच दृढ झाले़
महानगरातील विभक्त कुंटुब पद्धतीमुळे ऱ्हास होत जाणारे नातेसंबध सांभाळण्याची मोठी गरज आहे़ सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या सखीमंचने यासंबंधाने पाऊल टाकून सासू, सुनेच्या मनातील गूज व्यक्त करायला लावले़ टीव्हीवरील मालिका व मोबाईलवरील संभाषणामुळे जवळच्या माणसांचे महत्व कमी होते की काय, अशी भिती निर्माण झाली आहे़ मात्र आजुनही सुनेला लेक व सासूला आई म्हणत आपले नाते जोपासणाऱ्या कुटुंबांची ओळख सखीमंचच्या या संमेलनातून झाली़
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्वेता ठाकुर यांची ‘बाई मी लाडाची ग’ या गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले.
त्यानंतर प्रथम फेरीला सुरूवात झाली. सासुने सुनेचा तर सुनेने सासूचा परिचय करून दिला. त्यानंतर ज्युनिअर आमिताभ बच्चन यांच्या अभिनयाला सखींनी भरपूर दाद दिली. तसेच केबीसीसारखा गेम- शो ही ज्यु. अमिताभ बच्चन यांनी सखींसाठी आयोजित केला.
अनेक वेगवेगळ्या चित्रपटांच्या डायलॉगची मागणी सखींतर्फे ज्यु.अमिताभकडे केली. त्यांनी आपल्या खास शैलीत अमिताभचा अभिनय सादर केला़ त्यानंतर दुसऱ्या फेरीत सासू सुनेच्या विचारांची एकता पाहण्यात आली. सासू-सून या संमेलनात प्रथम विजेती जोडी मीनाक्षी हुरणे व प्रिया हुरणे, द्वितीय शोभा पांचाळ व राधिका पांचाळ, वंदना हुरणे व रेणुका कुबडे या संयुक्तरित्या विजेत्या ठरल्या. तृतीय कमल देशमाने व सुचिता देशमाने तसेच उत्तेजनार्थ बक्षीस अस्मिता मुक्कावार व सुदर्शना मुक्कावार यांना देण्यात आले. परिक्षक म्हणून माधुरी देशपांडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रायोजक राईडवेल हिरो व श्री साई हिरो हे होते. ( प्रतिनिधी)