संभाजी राजे यांची गुरुकृपा फरसाण मार्टला सदिच्छा भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:03 IST2021-07-05T04:03:51+5:302021-07-05T04:03:51+5:30
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संवाद यात्रेद्वारे खा. संभाजी राजे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. शहरात शुक्रवारी त्यांचे आगमन झाले ...

संभाजी राजे यांची गुरुकृपा फरसाण मार्टला सदिच्छा भेट
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संवाद यात्रेद्वारे खा. संभाजी राजे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. शहरात शुक्रवारी त्यांचे आगमन झाले तेव्हा त्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत गुरुकृपा फरसाण मार्टला सदिच्छा भेट दिली. फरसाण मार्टचे संचालक राजेंद्र पवार व कारभारी पा. औताडे यांनी त्यांचे स्वागत केले. गुरुकृपा फरसाण मार्टमध्ये कोरोनाकाळात अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करून स्वच्छतेची कशी काळजी घेतली जात आहे, याची माहिती दिली. ‘मराठी माणूस एवढे छान काम करू शकतो याचा मला अभिमान वाटतो. मराठी माणसाला व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी राजेंद्र पवार व कारभारी औताडे यांचा आदर्श आणि प्रेरणा घ्यायला हवी’, असे आवाहन खा. संभाजी राजे यांनी केले. पवार यांनी छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा देऊन संभाजी राजे यांचा सत्कार केला. यावेळी मनोहर गावडे, जगन्नाथ उगले, गणपतराव म्हस्के, समाधान औताडे यांच्यासह गुरुकृपा फरसाण मार्टमधील कर्मचारी उपस्थित होते.
कॅप्शन
खा. संभाजीराजे यांना गुरुकृपा फरसाण मार्टविषयी माहिती देताना संचालक राजेंद्र पवार.
(जाहिरात बातमी)