मालाची आवक मंदावली

By Admin | Updated: April 12, 2015 01:02 IST2015-04-12T00:47:15+5:302015-04-12T01:02:53+5:30

जालना : वातावरणातील बदलाचा परिणाम मोंढयातील मालाच्या खरेदी-विक्रीवरही झाला असून मालाची आवक मंदावल्याने बाजारात शुकशुकाट जाणवत आहे.

Goods Incentives | मालाची आवक मंदावली

मालाची आवक मंदावली


गेल्या महिन्यात सीसीआयकडून होत असलेली कापूस खरेदी आता बंद झाली असून त्यामुळे मोंढ्यातील दैनंदिन उलाढालीवर देखील परिणाम झाला आहे. ३ कोटींची उलाढाल आता १ कोटींवर आली आहे. सध्या केवळ गहू व ज्वारीचीच आवक सुरू असून त्यामुळे अन्य मालाला उठाव नाही.
गहू १२५० ते २२५०, ज्वारी ११४० ते २६१२, बाजरी १०५० ते १४००, मका १०२५ ते १२८६ या दराने विक्री होत आहेत.
तुरीची तेजी कायम असून तूरदाळ ४७०० ते ६४५१ रुपये प्रतिक्विंटल या दराने विक्री होत आहे. हरभरा ३२०० ते ३९१९, सोयाबीन ३३२५ ते ३४२५ रुपये आणि गुळ १९५० ते २२९९ रुपये प्रतिक्विंटल या दराने विक्री होत आहेत.

Web Title: Goods Incentives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.