दर्जेदार खेळाडू निर्माण झाले पाहिजे- सातव
By Admin | Updated: August 17, 2014 00:24 IST2014-08-17T00:24:28+5:302014-08-17T00:24:28+5:30
कळमनुरी : दर्जेदार खेळाडू निर्माण झाले पाहिजेत, असे प्रतिपादन खा. राजीव सातव यांनी केले.

दर्जेदार खेळाडू निर्माण झाले पाहिजे- सातव
कळमनुरी : शहरात तालुका क्रीडा संकुल उभे राहिले आहे. याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. सर्वच सुविधा यात उपलब्ध असून आणखी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यातून दर्जेदार खेळाडू निर्माण झाले पाहिजेत, असे प्रतिपादन खा. राजीव सातव यांनी केले.
येथील तालुका क्रीडा संकुल खा. सातव यांच्या उपस्थितीत खुले करण्यात आले. अध्यक्षस्थानी रजनीताई सातव, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे, नगराध्यक्षा यासमीन बेगम, उपनगराध्यक्ष म. नाजीम, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते, किशोर पाठक, मुख्याधिकारी के.एम. विरकुंवर, हफीज फारुकी, अॅड. कादरी, डॉ. संतोष टारफे, अजित मगर, शेख कलीम, म. रफीक, शेख फारुक, नंदकिशोर तोष्णीवाल, अरुण वाढवे, निहाल कुरेशी, बिलाल कुरेशी, म. मोईन, डॉ. उंबरकर, डॉ. कुमरे, सदाशिव जटाळे, सुवर्णा गाभणे, सुधीर देशमुख, केशव मस्के, कांतराव शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. सातव म्हणाले की, चांगल्या सुविधा या क्रीडा संकुलातून दिल्या जातील. स्विमींग पुलाची सुविधा, तिरंदाजी लांब व उंच उडीचे साहित्य आदी सुविधा केंद्र सरकारच्या निधीतून उपलब्ध करून दिल्या जातील. सर्वांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी या क्रीडा संकुलाचा उपयोग होईल. तालुुका क्रीडा संकुलासमोरच सशस्त्र सीमाबल, ग्रामीण रुग्णालयाची निवासस्थाने, साईनगर, ग्रीन पार्क आदी वस्त्या असून या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारचा निधी आणून या भागाचा विकास केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
खा. सातव यांच्या हस्ते साईनगर येथील पाणीपुरवठा, तालुका लघू पशु सर्वचिकित्सालय, विश्रामगृह ते नवीन बसस्थानक या चौपदरी रस्त्याचे भूमिपूजन व मुख्याधिकारी निवासस्थानाचे उद्घाटन खा. सातव यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन प्रा. आनंद पारडकर, अशोकसिंह ठाकूर यांनी केले. यावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (वार्ताहर)