शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

खुशखबर ! सातव्या वेतन आयोगानुसार पोलिसांना मिळणार पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:50 IST

वेतन सातव्या वेतन आयोगानुसार देण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून तयारी सुरू आहे. 

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत सुमारे साडेतीन हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना  एप्रिलचे वेतन हे सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार आहे. मे महिन्यात पोलिसांच्या हातात वाढीव वेतनच पडावे, याकरिता प्रशासनाकडून वेतन निश्चितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पोलीस आयुक्त ते उपनिरीक्षक पर्यंतच्या अधिकाऱ्यांची संख्या ही २०० पर्यंत आहे. राज्य शासनाने सातवा वेतन आयोग लागू केल्यापासून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट आहे. शासनाच्या निर्देशानुसार निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रथम वेतन आयोगाचा लाभ देण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे. आतापर्यंत अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीचे काम पूर्ण झाले. अधिकारी, कर्मचाऱ्यांना मे महिन्यात मिळणारे वेतन हे सातव्या वेतन आयोगानुसार देण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून तयारी सुरू आहे. 

वेतन निश्चितीचे काम सुरूपोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या की, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीचे काम सुरू आहे. साडेतीन हजार कर्मचारी येथे कार्यरत आहेत. यापैकी आजपर्यंत अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती झाली. उर्वरित काम पूर्ण झाल्यावर एप्रिल महिन्याचे वेतन बिल सातव्या वेतन आयोगानुसार कोषागार कार्यालयास सादर केले जाईल. मे महिन्यात पोलिसांना सातव्या वेतन आयोगानुसारच वेतन मिळेल.

मार्चचे वेतन अद्याप नाहीमार्च महिन्याचे वेतन अद्यापही पोलिसांना प्राप्त झाले नाही. याविषयी चौकशी केली असता मार्च एंडिंगमुळे कोषागार कार्यालयाने वेतन बिले स्वीकारण्यास नकार दिला होता, यामुळे पोलिसांचे वेतन निघाले नाही. दरवर्षी मार्च एंडिंगच्या कालावधीत पोलिसांचे वेतन लांबते, असा अनुभव असल्याचे काही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसfundsनिधी