शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदेगाव परिसराला गारपिटीचा तडाखा

By admin | Updated: August 22, 2014 00:57 IST

जालना : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने बुधवारपासून पुनार्गमन केले. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. जिल्ह्यात अंबड आणि मंठा तालुका वगळता सर्वत्र पाऊस झाला.

जालना : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने बुधवारपासून पुनार्गमन केले. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. जिल्ह्यात अंबड आणि मंठा तालुका वगळता सर्वत्र पाऊस झाला.जालना तालुक्यातील गोंदेगाव परिसरात गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात ४.९१ मि. मी पाऊस पडल्याची नोंद आहे.जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अद्यापपर्यंत दमदार पाऊस पडलेला नाही. गुरूवारी जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला.तसेच काही ठिकाणी हलकासा पाऊस झाला. जालना तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात पडलेल्या पावसाची नोद जालना- ८ मि. मी. भोकरदन-१७.३८, जाफराबाद २ मि. मी, बदनापूर १.८०, अंबड ००, घनसावंगी ८.७१, मंठा ००, अशी एकून सरासरी ४.९१ मि. मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त १३०.२१ मि. मी पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यात सर्वाधिक १९८ मि. मी. भोकरदन तालुक्यात तर सर्वात कमी मंठा तालुक्यात ६६.५ मि. मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. तीन महिन्यानंतर पाऊसकेदारखेडा: भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात मागील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर बुधवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच पूर्णा नदीला पाणी आले. पोळा सणाच्या तोंडावर पाऊस आल्याने शेतकरी आनंदीत झाले आहे.केदारखेडा परिसरात दडीमारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणात वाया गेलेली आहे. काही शेतकऱ्यांची पिके ठिबकच्या पाण्यावर जीवंत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या पिकांना बुधवारच्या पावसाने जीवदान मिळाले आहे. परिसरातील शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पहिल्यांदाच नदीला पाणीकेदारखेडा परिसरातून वाहणाऱ्या पूर्णा नदीला यावर्षी बुधवारी पडलेल्या पावसामुळे पहिल्यांदाच पाणी आले आहे. त्यामुळे नदीपात्रात असलेल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरींची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. नदीपात्रात केदारखेडासह परिसरातील सुमारे २९ गावांच्या पाणी पुरवठ्याच्या सार्वजनिक विहीरी आहेत. (प्रतिनिधी)जामवाडी: जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडला. अचानक झालेल्या या गारपिटीमुळे शेडनेट हाऊस मधील काकडी, सिमला मिरचीचे आतोनात नुकसान झाले. शिवाजी वाघ या शेतकऱ्याने बिजोत्पादनासाठी तयार केलेल्या नेट हाऊस मधील फळ धारणेस आलेल्या पिकांचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. ४काशिनाथ वाघ यांच्या मोसंबीचे आतोनात नुकसान झाले. तसेच कपासी व अन्य पिकांचे ही मोठे नुकसान झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी शुक्रवारी याची पाहणी केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख पंडितराव भुतेकर, अनुराग कपूर, सुधाकर वाढेकर आदींची उपस्थिती होती. तसेच मंडळ अधिकारी ठोंबरे, तलाठी खोतकर यांनी पाहणी केली.४चार महिन्यात तिसऱ्यांदा गारपीट - गोंदेगाव परिसरात गेल्या चार महिन्यात तिसऱ्यांदा गारपीट झाली. तीनही वेळेस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शासनाने पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.