गोल्ला-गोलेवार समाजाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:52 IST2017-09-15T00:52:50+5:302017-09-15T00:52:50+5:30
नायगाव तालुक्यातील एका बालकावर अत्याचार करुन त्याची हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी गोल्ला-गोल्लेवार समाजाच्यावतीने नांदेड येथे निषेध मोर्चा काढण्यात आला.

गोल्ला-गोलेवार समाजाचा मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नायगाव तालुक्यातील एका बालकावर अत्याचार करुन त्याची हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी गोल्ला-गोल्लेवार समाजाच्यावतीने नांदेड येथे निषेध मोर्चा काढण्यात आला.
सावरखेड ११ वर्षीय बालकावर नराधमाने लैंगिक अत्याचार केले तसेच त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा या प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाध्यक्ष नामदेव आयलवाड, पी.पी. बंकलवाड, नरसिंगराव बहिरवाड, मारोतराव बल्लाळकर, रामचंद्र येईलवाड, अरुण पाटील, नगरसेवक संजय आऊलवार, सायन्ना गोंदरवाड, मारोतराव तोटेवाड, पं.स. सदस्य कपिल करेवाड, भुमन्ना आक्केमवाड आदींचा सहभाग होता.
या मोर्चास माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, सुरेश गायकवाड, राजेश रापते, राजेश पवार, शिरीष गोरठेकर, गोविंदराव सुरनर, नंदकिशोर कोसबतवार, नाना लकारे, गोविंदराव फेसाटे, चंद्रप्रकाश देगलूरकर, गणेश गुंडेवाड, सुरेश चंदावाड, प्रदीप राठोड, संजय कौडगे, माणिकराव लोहगावे, रविंद्र भिलवंडे आदींनी संबोधित केले.