सुवर्ण सखी योजनेचा लकी ड्रॉ आज निघणार
By Admin | Updated: August 21, 2014 00:24 IST2014-08-21T00:23:53+5:302014-08-21T00:24:09+5:30
सुवर्ण सखी योजनेचा लकी ड्रॉ आज निघणार

सुवर्ण सखी योजनेचा लकी ड्रॉ आज निघणार
औरंगाबाद : लोकमत सखी मंचच्या वतीने सदस्यांसाठी २१ आॅगस्ट रोजी श्रावण सोहळ्यात संत तुकाराम नाट्यगृह, एन-५ सिडको येथे दुपारी ३ वाजता विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हास्तरीय सुवर्ण सखी योजनेचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. सोहळ्यात सखींना विविध स्पर्धांत सहभाग घेऊन आनंद घेता येणार आहे. भाग्यवान विजेत्यांना सोन्याचे दागिने जिंकण्यासोबत सिनेअभिनेत्री ऋजुता देशमुखला भेटण्याची संधी मिळणार आहे.
श्रावण सोहळ्यात सखींना श्रावण साज (फॅशन शो), उखाणे स्पर्धा, मेंदी, थाळी डेकोरेशन स्पर्धांत आणि मंगळागौरीच्या खेळात सहभाग घेऊन आकर्षक बक्षिसे जिंकता येणार आहेत. असोसिएट स्पॉन्सर भाग्य विजय अॅस्ट्रो वास्तू सोल्युशन, रिसो राईसब्रान आॅईल, गिफ्ट पार्टनर दिवा फॅशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सखी मंच सदस्यांच्या नोंदणीच्या वेळी जिल्हास्तरीय सुवर्ण सखी योजनेचे प्रायोजकत्व प्रोझोन मॉलने स्वीकारले होते. लाखो सखींनी योजनेत सहभाग घेतला होता. त्या सखींपैकी लकी ड्रॉमध्ये अनेक भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.
कोणाची निवड होईल याविषयी सदस्यांमध्ये उत्सुकता होती. विजेत्या सखींना लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने मिळणार आहेत. जास्तीत जास्त सदस्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.