हुंड्यात सोने, वाहन अन् प्लॅटही !
By Admin | Updated: April 11, 2015 00:20 IST2015-04-11T00:00:53+5:302015-04-11T00:20:38+5:30
संजय तिपाले , बीड हौसेला मोल नसते असे म्हणतात ते काही चुकीचे नाही. लग्नसोहळ्यात वधू-वरांचे लाड पुरविताना कुठलीही कमी राहू नये, याची खबरदारी घेतली जाते.

हुंड्यात सोने, वाहन अन् प्लॅटही !
संजय तिपाले , बीड
हौसेला मोल नसते असे म्हणतात ते काही चुकीचे नाही. लग्नसोहळ्यात वधू-वरांचे लाड पुरविताना कुठलीही कमी राहू नये, याची खबरदारी घेतली जाते. हौसेपायी पैशांची उधळपट्टी करण्याचा ‘हायप्रोफाईल’ कुटुंबांमधील ‘ट्रेंड’ आता दुष्काळी बीडमध्येही आला आहे. हुंड्यात रोख पैशांऐवजी सोने, वाहन, प्लॅट अन् इतर महागडे गिफ्ट देण्याची नवी पद्धत रुढ होते आहे.
जिल्ह्यात सध्या लग्नसराईची धूम सुरु आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे काही कुटुंबांमध्ये ‘यंदा कर्तव्य नाही’ चा सूर आहे. काहींनी लग्नसोहळ्यांचे मुहूर्त पुढे ढकलेले आहेत. त्यामुळे खरेदीवर परिणाम झाला असून व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, श्रीमंत कुटुंबातील मंडळींना मात्र दुष्काळाची झळ नाही.
पैसा खर्च झाला तरी सोहळा भन्नाट झाला पाहिजे अशी अपेक्षा बाळगणाऱ्यांचीही कमी नाही. अगदी निमंत्रण पत्रिकांपासून ते शामियाना व जेवणातील मेनूपर्यंत ‘हटके’ देण्याचा प्रयत्न काही वधूपिता करत असतात.
पत्रिकांमध्येही डिजीटल लुक तेजित आहे. साध्या पत्रिकांची किंमत २ ते ५ रुपयांपर्यंत आहे. डिजीटल व आकर्षक बनावटीच्या पत्रिका १० ते २०० रुपयांपर्यंत मिळतात. गरीब कुटुंंबातील लग्न सोहळ्यातही आता ५ ते १० रुपयांपर्यंतची पत्रिका छापून घेतल्या जातात. श्रीमंतांमध्ये तर लक्षवेधी व उत्तम प्रकारच्या पत्रिका छापून घेण्याची स्पर्धाच असते.
हुंंडा नको, मुलगी द्या!
काही समाजांमध्ये मुलींची संख्या झपाट्याने घटते आहे. त्यामुळे नोकरदार वरांनाही वधू मिळणे कठीण बनत आहे. हुंडा नको, मुलगी द्या... असा सूर आवळून काही वरपिता लग्नखर्चही स्वत:च उचलत असल्याचे दिसते.
परिवर्तनवादी विचाराचे वधूवर आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना प्राधान्य देत आहेत. असे विवाह प्रामुख्याने ‘कोर्ट मॅरेज’ या संकल्पनेखाली होत असल्याचे दिसून येत आहे.