गंगापुरात सोन्याचे दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:04 IST2021-09-24T04:04:27+5:302021-09-24T04:04:27+5:30

बुधवारी रात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. यावेळी २२ हजार रूपये किमतीच्या गोल्ड प्लेटिंग केलेल्या पंधरा पाकीट ...

Gold shop blown up in Gangapur | गंगापुरात सोन्याचे दुकान फोडले

गंगापुरात सोन्याचे दुकान फोडले

बुधवारी रात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. यावेळी २२ हजार रूपये किमतीच्या गोल्ड प्लेटिंग केलेल्या पंधरा पाकीट मोरण्या, ४९ हजार ६०० रुपये किमतीच्या चांदीच्या कोल्हापुरी चेन, ब्रेसलेट, कंबर आकडे, जोडवे असे एकूण ७१ हजार ६०० रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेराचा डिव्हीआरदेखील चोरी केला आहे. पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक भगवान झरेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. आरोपींचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला तसेच ठसेतज्ञाना पाचारण करण्यात आले. मात्र, चोरीचा सुगावा लागू शकला नाही. याप्रकरणी दुकानदार गणेश सद्भावे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान झरेकर करत आहेत.

230921\190-img-20210923-wa0042.jpg

गंगापूर : पुढील शटर उचलून याच ज्वेलर्समध्ये चोरट्यांनी चोरी केली

Web Title: Gold shop blown up in Gangapur