शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

रशिया-युक्रेन युद्धाने भारतीय गव्हाला सोन्याचा भाव; अस्सल शरबती गहू ५ हजार रुपये क्विंटलवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 13:10 IST

सध्या भारत १० प्रमुख देशांत गव्हाची निर्यात करीत आहे यामुळे किंमती आणखी वाढण्याची शक्यता

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : सध्या वार्षिक धान्य खरेदीचा हंगाम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. मात्र, यंदा मध्यम प्रकारचा गहू २७०० ते ३९०० रुपये क्विंटलपर्यंत विकत आहे. यामुळे ज्याच्या त्याच्या तोंडातून ‘गहू भयंकर महाग झाला आहे’, असेच उद्गार बाहेर पडत आहेत. असली शरबती तर हजार रुपयांनी वाढून ५ हजारापर्यंत गेला आहे. गव्हातील भाववाढीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत नवीन उच्चांक गाठला आहे.

युद्धाने गहू उत्पादकांच्या हाती पैसारशिया-युक्रेन युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. मात्र, हेच युद्ध भारतीय गव्हासाठी फायदेशीर ठरले आहे. आता तुम्ही म्हणाल की, त्या युद्धाचा व येथील गव्हाचा काय संबंध? जगात गहू निर्यातदार देशांमध्ये रशियाचा पहिला क्रमांक असून, युक्रेन पाचव्या स्थानावर आहे. या युद्धात गव्हाचे मोठे नुकसान झाले. यामुळे भारतीय गव्हाला मागणी वाढल्याने गव्हाच्या किमती वधारल्या.

कोणत्या देशात गव्हाची निर्यातसध्या भारत १० प्रमुख देशांत गव्हाची निर्यात करीत आहे. यात बांगलादेश, श्रीलंका, यूएई, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, येमेन, नेपाळ, कोरिया, कतार, ओमान या देशांचा समावेश आहे.

स्थानिक ठोक बाजारात गव्हाचे भावगव्हाचे प्रकार मे २०२१ (क्विंटल) मे २०२२अस्सल शरबती ३८००-४००० रु. ४३००- ४७०० रु.मिनी शरबती २२००-२८०० रु. २७००-३१०० रु.लोकवन २१००-२६०० रु. २६००-३००० रु.४९६ वाण २१००-२४०० रु. २५००-२९०० रु.

हलक्या प्रतीच्या गव्हाचा रवा, मैदा, आटाहलक्या प्रतीचा गहू मागील वर्षी २००० रुपये क्विंटलने विकला होता. यंदा तोच २४०० ते २५०० ला आहे. रवा, मैदा, कणिक तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हा गहू महागल्याने रवा, मैदा, पीठही महागले आहे.- नीलेश सोमाणी, गव्हाचे व्यापारी

गहू आणखी महागणारदर महिन्याला निर्यात वाढत आहे. सरकारी गोदामात यंदा तुटवडा राहणार आहे. युद्ध कधी संपणार, माहीत नाही. युद्ध संपले तरी पूर्वपदावर परिस्थिती येण्यास किती काळ लागेल, हे माहिती नाही. यामुळे पुढील दोन ते तीन वर्षे भारतीय गव्हाला विदेशातून मागणी राहील. यामुळे किमतीत आणखी वाढ होऊ शकते.- जगदीश भंडारी, गव्हाचे व्यापारी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया