शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बंद घर फोडून रोख तीन लाखासह सोन्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 19:49 IST

बजाजनगरातील जय भगवान सोसायटीत बंद घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला. यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी पाहणी करून श्वान पथकाच्या मदतीने चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देबजाजनगरात चोरट्यांचा धुमाकूळ 

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच असून गावी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडल्याची घटना आज गुरुवार (दि.२९) सकाळी बजाजनगरात उघडकीस आली. या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी रोख ३ लाख रुपये व ७ ते ८ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे पुढे आहे. 

या विषयी अधिक माहिती अशी की, छोटुलाल दादाजी हेमाडे हे पत्नी सविता मुली प्रतिक्षा, साक्षी व मुलगा हर्ष यांच्यासोबत बजाजनगरातील जय भगवान हौसिंग सोसायटीत वातव्यास आहेत. वडिलांचे वर्षश्राद्ध असल्यामुळे हेमाडे पती-पत्नी मुलांना घरी ठेऊन सोमवारी (दि.२६) नंदुरबारला गावी गेले होते. आई-वडील गावी गेल्यामुळे रात्री मुले घरी घाबरतील या भितीमुळे मामा प्रा. सचिन घुगे यांनी तीनही भाच्यांना सोबत घेऊन बजाजनगरात आपल्या घरी गेले होते. आज गुरुवारी (दि.२९) सकाळी हेमाडे यांच्या घराचे कुलुप तुटलेले व घरात कुणीही नसल्याचे शेजारी राहणाऱ्या देवकर यांच्या लक्षात आले. देवकर यांनी लागलीच हेमाडे यांच्याशी संपर्क करून याची माहिती दिली. यानंतर हेमाडे यांनी पत्नीचा भाऊ प्रा. सचिन घुगे यांना घरी जाऊन पाहणी  करण्यास सांगितले. घुगे घरी आले असता त्यांना घरातील साहित्य अस्तव्यस्त पडलेले व कपाटातील काही वस्तुही गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यास दिली.

दागिने आणि रोकड लंपासचोरट्यांनी बुधवारी रात्री कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यानंतर दोन्ही कपाटात ठेवलेले रोख ३ लाख रुपये आणि साडे तीन तोळ्याचे गंठन, तीन तोळे वजनाच्या पाच अंगठ्या, चैन, कर्णफुले असे जवळपास ७ ते ८ तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबविल्याचे समोर आले आहे. या चोरीची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे, उपनिरीक्षक राजेंद्र बांगर, सतीश पंडीत आदीच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

ठसे तज्ज्ञ व श्वानाकडून चोरट्याचा शोध ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाने बजाजनगरात भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्वान ‘स्विटी’हिने चोरट्याचा माग काढत हेमाडे यांच्या घरा लगत असलेल्या बजाज विहारची संरक्षक भिंती ओलांडून सिडको वाळूजमहानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाऊन थांबली. दरम्यान, बजाज विहारातील भुखंडावर दारुच्या बाटल्याही पोलिसांना मिळून आल्या आहेत. चोरी केल्यानंतर चोरटे बजाज विहारातील भुखंडावरुन सिडकोमहानगरात पोहचल्यानंतर वाहनाने पसार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस