गोदावरी मनार, कलंबर कारखाना विक्रीला

By Admin | Updated: October 6, 2014 00:13 IST2014-10-06T00:08:19+5:302014-10-06T00:13:37+5:30

रामेश्वर काकड, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गत अनेक वर्षापासून थकलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी जिल्ह्यातील गोदावरी मनार व कलंबर हे दोन सहकारी साखर कारखाने विक्रीला काढले आहेत.

Godavari Manar, Kalamb factory was sold | गोदावरी मनार, कलंबर कारखाना विक्रीला

गोदावरी मनार, कलंबर कारखाना विक्रीला

रामेश्वर काकड, नांदेड
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गत अनेक वर्षापासून थकलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी जिल्ह्यातील गोदावरी मनार व कलंबर हे दोन सहकारी साखर कारखाने विक्रीला काढले आहेत. यामुळे जिल्हा बँकेचे कर्ज थकविलेल्या इतर सर्वच सहकारी संस्थांचे धाबे दणाणले आहेत.
अवसायनात असलेल्या शंकरनगर येथील गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५४ कोटी ८६ लाख रुपये कर्ज थकले आहे. तर कलंबर येथील कलंबर विभाग सहकारी साखर कारखान्याकडे ४७ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे.
सदर कारखान्यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले परंतु त्यानंतर मात्र कर्जाची परतफेड केलीच नाही़ शेवटी कारखाने अवसानायात येवून बंद पडले. यानंतर जिल्हा बँकेने साखर कारखान्याकडील थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी बंद कारखाने कर्जापोटी विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला आहे.
गतवर्षी २०१३ या वर्षात बँकेचे एनपीएचे (अनुत्पादीत मालमत्ता) प्रमाण ३६.६१ टक्के होते. तर २०१४ या वर्षात एनपीएचे प्रमाण ३५.९२ टक्यावर आले आहे. एकूण थकलेल्या कर्जापैकी बिगरशेती एनपीएचे प्रमाण ९०.८१ टक्के तर शेतीकर्ज एनपीएचे प्रमाण ९.१९ टक्के आहे. ३१ मार्च २०१४ अखेरपर्यंत बँकेचे एकूण २०३ कोटी ६२ लाख ४१ हजार एवढे कर्ज येणे आहे. त्यापैकी बिगरशेती एनपीए १८४ कोटी ९१ लाख १४ हजार असून पैकी १४५ कोटी रुपये साखर कारखान्यांकडे थकले आहेत. यात गोदावरी मनार साखर कारखान्याकडे ५४ कोटी ८६ लाख तर कलंबर विभाग सहकारी साखर कारखान्याकडे ४७ कोटी १८ लाख थकले आहेत. कर्जाच्या वसुलीसाठी सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्ट २००२ अतंर्गत कारखान्याची मालमत्ता जप्त करुन मे.डोलेक्स इंडस्ट्रीज मुंबई यांना ६ वर्षासाठी भाडेतत्वावर चालविण्यास दिला होता. त्यातून ६१६.७९ लाख वसुली झाली. परंतु कारखाना अवसायानात आल्यामुळे उर्वरित थकीत रक्कम वसुल करण्यासाठी सेक्टुरिटायझेशन अ‍ॅक्ट २००२ अंतर्गत कारखाना विक्रीस काढला आहे. याशिवाय कलंबर कारखानाही अवसायनात आल्यामुळे विक्रीस काढला.
२००५ मध्ये आर्थिक परिस्थिती खालावल्याने महाराष्ट्र सहसंस्था अधिनियमानुसार बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन १९ मार्च २००५ मध्ये बँकेवर प्रशासकाची नेमणूक केलेली आहे. परंतु येत्या महिनाभरात बँकेवर संचालक मंडळ निवडण्यात येणार आहे. संचालक मंडळाच्या कुटान्यामुळे अवसायानात आलेल्या मध्यवर्ती बँकेची प्रशासक नेमल्यानंतर प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. चालू अर्थिक वर्षात ठेवीत १८ कोटी १२ लाखांची वाढ झाली. तर आजघडीला बँकेकडे ३०२ कोटींच्या विविध स्वरुपाच्या ठेवी जमा आहेत. बँकेस २०१४ या वर्षात २ कोटी ९८ लाख ७६ हजार रुपयांचा नफा झाला आहे.
गतवर्षी वैधानिक लेखा परीक्षण अहवालानुसार बँकेस क वर्ग दिला होता, परंतु चालू अर्थिक वर्षात लेखापरीक्षण अहवालानुसार बँकेस ब वर्ग प्राप्त झाला आहे. बँकेचे नक्तमुल्य २३ कोटी ३८ लाख ऐवढे झाले असून वसुलीचे प्रमाण ६८.९२ टक्यावरुन ६९.८० टक्यावर आले. यामुळे बँकेची अर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे.

Web Title: Godavari Manar, Kalamb factory was sold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.