देव माझा विठू सावळा़़़

By Admin | Updated: July 6, 2014 00:15 IST2014-07-06T00:11:22+5:302014-07-06T00:15:09+5:30

भारत दाढेल, नांदेड भारतातील तेरा भाषांतील साडेतेरा हजारांहून अधिक गीते गाऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ख्यातकीर्त गायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांनी आषाढी महोत्सवाला प्रारंभ झाला़

God will be my savior; | देव माझा विठू सावळा़़़

देव माझा विठू सावळा़़़

भारत दाढेल, नांदेड
भारतातील तेरा भाषांतील साडेतेरा हजारांहून अधिक गीते गाऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ख्यातकीर्त गायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांनी यंदाच्या आषाढी महोत्सवाला प्रारंभ झाला़ यावेळी सुमनतार्इंच्या गीतांवर आधारित सुमनांजली या कार्यक्रमाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद देत संगीत मैफलीचा आनंद घेतला़
लोकनेते स्व़ गोपीनाथ मुंडे नगरी, डॉ़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात शनिवारी सायंकाळी आषाढी महोत्सवाचे उद्घाटन सुमन कल्याणपूर यांच्या हस्ते करण्यात आले़ अध्यक्षस्थानी माजी खा़ सुभाष वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, सुधाकर पांढरे, देसाई महाराज, पुजा चव्हाण, दादासाहेब सातारकर यांची उपस्थिती होती़
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले़ कार्यक्रमाचे संयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले़
प्रास्ताविकात राजश्री पाटील यांनी हा महोत्सव आता कोणत्याही पक्ष, संघटनेचा राहिला नसून तो लोकोत्सव झाल्याचे सांगितले़ हा महोत्सव दिवसेंदिवस असाच वृध्दींगत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़
माजी खा़ वानखेडे म्हणाले, जग झपाट्याने बदलत आहे़ या प्रवाहात माणसे विचारापासून कोसोदूर गेले आहेत़ माणूस माणसाला विसरले आहेत़ अशा परिस्थितीत समाजाला जोडून ठेवणाऱ्या, भाव, भक्तीचा संदेश देणाऱ्या आषाढी महोत्सवाने सर्वांना जोडले आहे़
ओंकार प्रदान रूप गणेशाचे़़़ या अभंगाने सुमनतार्इंच्या गीतांवर आधारित दिवाकर चौधरी प्रस्तुत सुमनांजली हा कार्यक्रम सादर झाला़ यावेळी केतकीच्या बनी नाचला ग मोर, नावीकारे वारा वाहे़़़ रहेना रहे हम़़ व देव माझा विठू सावळा़़ ही गीते संचाने सादर केली़
मंगला खाडिलकर यांनी सुमनतार्इंच्या जीवनाचे पैलू उलगडून दाखविले़ सुमन कल्याणपूर म्हणजे भावगीतातील हिरवा चाफा़़़ असे म्हणत खाडिलकर यांनी, बुद्धिजीवी माणसांच्या अभ्यासाचा विषय असलेल्या सुमनतार्इंनी आजवर अनेक गीते गायले़ मात्र व्यासपीठावर त्या कमी वेळाच दिसल्या़ सुमनताई मराठवाड्यात प्रथमच नांदेडला आल्याचे सांगितले़ श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़

Web Title: God will be my savior;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.