पैठणमध्ये ३५ हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य

By Admin | Updated: June 27, 2016 01:06 IST2016-06-27T00:35:00+5:302016-06-27T01:06:36+5:30

पैठण : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत पैठण शहर व तालुक्यात ३५ हजार ४७ वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य ठेवले आहे

The goal of cultivating 35,000 trees in Paithan | पैठणमध्ये ३५ हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य

पैठणमध्ये ३५ हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य


पैठण : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत पैठण शहर व तालुक्यात ३५ हजार ४७ वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी विविध शासकीय कार्यालयांनी जबाबदारी घेतली आहे, अशी माहिती तहसीलदार किशोर देशमुख यांनी दिली.
१ जुलै रोजी शासकीय प्रशासन व लोकसहभाग यातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांनी तहसील कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत आढावा घेतला. पैठण पंचायत समिती शिक्षण विभागाने ५ हजार वृक्षारोपन करण्याची जबाबादारी घेतली आहे, तर ग्रामपंचायत विभाग १३ हजार ८८७ वृक्ष लागवड करणार आहे. सामाजिक व वन विभाग १२ हजार, सहायक निबंधक सहकारी संस्था व तहसील कार्यालय प्रत्येकी १ हजार वृक्ष लागवड करणार आहे.
या उपक्रमात हलगर्जीपणा करू नये व लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची दक्षता घेण्याची सूचना तहसीलदार देशमुख यांनी केली आहे.
या बैठकीत सहायक निबंधक श्रीराम सोन्ने, न.प. पा.पु. प्रमुख भगवान कुलकर्णी, सार्वजनिक वन लागवड अधिकारी एस.जी. देशपांडे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब पायघन, कृषी अधिकारी आर.जी. पाठक, पाटबंधारे विभागाचे एस.के. हनवते, सहायक बीडीओ उषा मोरे, आगारप्रमुख डी.एल. लांडगे, डॉ. सुहास पारशेवार, भूमी अभिलेखचे एल.पी. नलमेलवार, लघु सिंचनचे पी.डी. मगरे, एस.बी. शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पी.आर. डोंगरे, कनिष्ठ अभियंता सुधाकरराव काकडे, जायकवाडीचे अभियंता बी.एस. अजमेरा, आर.ए. नागापूरकर, गोपनीय शाखेचे गणेश शर्मा, डॉ. जी.के. इंगोले, आर.जी. गायकवाड, एस.ए. जरांगे, आर.डी. गुरव, एम.एस. पटेल, के.व्ही. राजगे, सोपानराव तारे, डी.आर. पत्की, सुखनंद बनसोडे, अविनाश निळेकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: The goal of cultivating 35,000 trees in Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.