महसूलदिनी दहा जणांचा गौरव
By Admin | Updated: August 2, 2014 01:43 IST2014-08-02T00:34:02+5:302014-08-02T01:43:45+5:30
हिंगोली : महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
महसूलदिनी दहा जणांचा गौरव
हिंगोली : महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम तर आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, नूतन जिल्हाधिकारी टी. जी. कासार, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र परळीकर, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष, अनुराधा ढालकरी, पुरवठा अधिकारी लतिफ पठाण आदींची उपस्थिती होती.
तहसीलदार अरविंद नर्सीकर, नायब तहसीलदार सारंग चव्हाण, लिपिक आय. जी. शेट्टे, अव्वल कारकून बी. जे. कारगुडे, मंडळ अधिकारी पी. टी. पतंगे, स्टेनो जी. डी. वानखेडे, तलाठी ए. पी. काकडे, चालक ए. सी. वाघमारे, शिपाई दिलीप भुक्तर व कोतवाल लक्ष्मण पातळे यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरव करण्यात आला. तर प्राधिनिधीक स्वरुपात कूळ कायद्यातील सातबारा सीताराम दीपके व सुदाम नरवाडे या शेतकऱ्यांना प्रदान केली. सूत्रसंचालन तहसीलदार विद्याचरण कडवरकर तर नायब तहसीलदार राजेश लांडगे यांनी आभार मानले. (जिल्हा प्रतिनिधी)
सामान्य नागरिकांना चांगली सेवा द्या- जिल्हाधिकारी
महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना महसूलच्या कामाव्यतिरिक्त इतर अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. सदरील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी योग्य नियोजन करावे व सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून अधिक चांगली सेवा द्यावी.महसूल विभागातील तलाठी हा एक महत्वाचा घटक असून, तलाठ्यांनी आपल्या कामाचा वर्षभराचा आराखडा तयार करावा. तसेच शासनाच्या तलाठी रेकॉर्डचे संगणकीकरणाच्या कामात चांगल्या पद्धतीने सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची कामे व्यवस्थित झाल्यास प्रशानावरील ताण कमी होत असतो. त्यामुळे सर्वांनी चांगले काम केल्यास लोकप्रतिनिधी म्हणून आमचीही सहकार्याचीच भूमिका असते, असे आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सांगितले.
नूतन जिल्हाधिकारी टी.जी. कासार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले, आपल्या कार्यालयात आलेला प्रत्येक माणूस येथून जात असताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असले पाहिजे. याकरिता प्रत्येकामध्ये संवेदनशीलता, कार्यतत्परता व समन्वय असणे आवश्यक आहे.