राज्य व विभागात प्रथम येणाऱ्या मुला-मुलींचा गौरव

By Admin | Updated: March 5, 2015 00:02 IST2015-03-04T23:44:14+5:302015-03-05T00:02:53+5:30

लातूर : दहावी व बारावीच्या परीक्षेत राज्यात व बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या गुणवंत मुला-मुलींना वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

The glory of the first boys and girls in the state and division | राज्य व विभागात प्रथम येणाऱ्या मुला-मुलींचा गौरव

राज्य व विभागात प्रथम येणाऱ्या मुला-मुलींचा गौरव


लातूर : दहावी व बारावीच्या परीक्षेत राज्यात व बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या गुणवंत मुला-मुलींना वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. राज्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर बोर्डात प्रथम येणाऱ्यास प्रत्येकी ५१ हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन या पुरस्काराने गौरविले जाईल.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने गेल्या २५ फेब्रुवारी रोजी हा निर्णय घेतला असून, राज्यस्तरावर दरवर्षी १ जुलै रोजी या पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातून दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस प्रत्येकी १ लाख रुपये देऊन सन्मान केला जाईल. २ लाख रुपये या पुरस्कारासाठी खर्च केले जातील. तर बोर्डामध्ये याच प्रवर्गातून प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस प्रत्येकी ५१ हजार रुपये असे ८.१६ लाख रुपये पुरस्कारावर खर्च केले जातील.
बारावीच्या परीक्षेत विमुक्त जाती व भटक्या जाती प्रवर्गातून राज्यात प्रथम आलेल्या मुला व मुलीस प्रत्येकी १ लाख असे २ लाख तर बोर्डात प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस प्रत्येकी ५१ हजार रुपये देऊन पुरस्कार दिला जाईल. असे एकूण ८.१६ लाख रुपये बोर्डातील विद्यार्थ्यांवर खर्च होईल.
२०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षापासून ही योजना अंमलात आली आहे. योजना केवळ विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींसाठी आहे़ (प्रतिनिधी)
विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाने पारितोषीक योजना जाहीर केली आहे़ विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या प्रवर्गातून राज्यात प्रथम येणाऱ्या दहावीच्या व बारावीच्या मुलांना व मुलींना प्रत्येकी १ लाख रुपयाचे पारितोषीक गौरवपूर्वक दिले जाणार आहे़ शिवाय, दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत विभागात प्रथम येणाऱ्या मुला-मुलींनाही प्रत्येकी रोख ५१ हजार रुपये या योजनेत पारितोषीक आहे़ उच्च माध्यमिक शिक्षणातील या प्रवर्गातील मुला-मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना शासनाने सुरु केली आहे़

Web Title: The glory of the first boys and girls in the state and division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.