शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गौरवास्पद! ६२ देशांच्या २०० प्रकल्पांच्या सादरीकरणात खाम नदी प्रकल्पाला पुरस्कार

By मुजीब देवणीकर | Updated: May 22, 2024 11:31 IST

खाम नदी पात्रातील गाळ काढणे, पात्र रुंद करणे आणि दोन्ही बाजूने दगडांची पिचिंग करण्याचे काम चार वर्षांपासून सुरू आहे.

 

छत्रपती संभाजीनगर : खाम नदीपात्राला गतवैभव मिळवून देण्यासाठी पाच वर्षांपासून महापालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पाची आता आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट रॉस सेंटर प्राइज फॉर सिटीज’ अंतर्गत जगभरातील ६२ देशांनी आपले २०० पेक्षा अधिक अनोखे, नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. अंतिम पाच प्रकल्पांमध्ये खाम नदीपात्राने पुरस्कार पटकावला.

वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटतर्फे दरवर्षी हा प्रतिष्ठित पुरस्कार घोषित करण्यात येतो. नावीन्यपूर्ण कल्पना, दूरदर्शी प्रकल्प, शाश्वत विकास इ. मुद्द्यांवर जगभरातील विविध शहरे यात सहभागी होतात. यंदा पुरस्काराची थीम, हवामानासाठी सज्ज समुदायांना गती देणे अशी आहे. खाम नदी प्रकल्पाने यात बाजी मारली. खाम नदीपात्राला गतवैभव मिळवून देण्यासाठी महानगरपालिका, छावणी परिषद, व्हेरॉक, इकोसत्व यांच्या संयुक्त विद्यमाने २०२१ मध्ये प्रकल्प सुरू झाला. तत्कालीन मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या नेतृत्वाखाली कामाला सुरुवात करण्यात आली. नागरिक-खासगी-प्रशासन या तत्त्वावर प्रकल्प पुढे नेण्यास सुरुवात झाली. प्रत्येक शनिवारी नागरिक नदीची स्वच्छता करण्यास, सुशोभीकरण करण्यास व वृक्षारोपण करण्यास पुढाकार घेतात.

शहरासाठी अत्यंत गौरवाची बाबआपले शहर आता जागतिक नकाशावर आले आहे. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट रॉस सेंटर प्राइज फॉर सिटीजसाठी प्रथम पाचमध्ये छत्रपती संभाजीनगरसोबत न्यूयॉर्क, ब्राझील, अर्जेंटिना व ओस्लो, नॉर्व्हे देशांमधील प्रकल्पांची निवड झाली. आपल्या शहरासाठी ही अत्यंत गौरवाची बाब आहे. या प्रकल्पाशी संबंधित संस्था, व्यक्ती व नागरिकांचे आणि माझ्या, महानगरपालिकेतील, टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. नदीची स्वच्छता करण्यास बरेच कठोर परिश्रम घ्यावे लागतात.- जी. श्रीकांत, मनपा प्रशासक.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाriverनदी