लोकमत सखी मंच सदस्यांसाठी बँजो चित्रपटाची झलक
By Admin | Updated: September 12, 2016 23:22 IST2016-09-12T23:13:50+5:302016-09-12T23:22:54+5:30
औरंगाबाद : ‘बँजो’ ही एक कहाणी आहे, ही एक यात्रा आहे. खऱ्या म्युझिकच्या शोधासाठी सातासमुद्रापार केलेला प्रवास म्हणजे ‘बँजो’.

लोकमत सखी मंच सदस्यांसाठी बँजो चित्रपटाची झलक
औरंगाबाद : ‘बँजो’ ही एक कहाणी आहे, ही एक यात्रा आहे. खऱ्या म्युझिकच्या शोधासाठी सातासमुद्रापार केलेला प्रवास म्हणजे ‘बँजो’.
मल्टिस्टारर चित्रपटानंतर रितेश देशमुख ‘बँजो’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्ट्रीट रॉकस्टार असलेल्या रितेशला जीवनात मोठे नाव कमावण्याची इच्छा असते. हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून रितेश आपले आयुष्य जगत असतो. ‘बँजो’ चित्रपटातील रितेश देशमुखची नायिका नर्गिस फाकरी ही न्यूयॉर्कमध्ये डिस्क जॉकी (डीजे) असून ती खऱ्या संगीताच्या शोधात मुंबईला येते आणि तिची भेट रितेश देशमुखशी होते. या भेटीतून भारतातील बँजो कलाकारांचा जीवनपट उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘बँजो’ हा चित्रपट शुक्रवार, २३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून ‘लोकमत’ मीडिया पार्टनर आहे. ‘लोकमत’ व ‘बँजो’ मिळून प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला लोकमत वाचकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. खास तुमच्यासाठी गणपतीच्या गाण्यांचा कार्यक्रम दि.१४ सप्टेंबर रोजी दु.४ वा. लोकमत हॉल, लोकमत भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेश मागील गेटने देण्यात येईल.